महाराष्ट्र

maharashtra

Pune : डिपॉझिट परत मागणाऱ्या पेईंग गेस्ट मुलींना घरमालकीनीने कोंडून ठेऊन केले 'असे' काही

By

Published : Mar 4, 2022, 1:16 PM IST

Updated : Mar 4, 2022, 4:23 PM IST

पुण्याला शिक्षणाचे माहेर घर मानल्या जाते तसेच येथे मोठ्या प्रमाणात आता आयटी कंपन्याही आहेत. त्यामुळे येथे शिक्षणासाठी आणि कामासाठी मोठ्या प्रमाणात बाहेर गावातून विद्यार्थी आणि मुले हे येतात. त्यामुळे आता येथील PG व्यवसायाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळेतो. पुण्यातील चंदननगर भागात दोन मुली एका ठिकाणी पेईंग गेस्ट म्हणून राहत होत्या. यासाठी त्यांनी घरमालकाला काही पैश्यांचे डिपॉझिटही दिले होते. त्या PG सोडून जात असताना त्यांनी आपण दिलेले डिपॉझिट परत मागितले. यावेळी त्यांना घरमालिकीने घरात कोंडून ठेवून मारहाण केल्याची ( Girls beaten for demanding return of deposit in Pune ) धक्कादायक घटना घडली आहे.

PG Girls beaten
पुण्यात पेईंग गेस्टला मारहाण

पुणे - पुण्याला शिक्षणाचे माहेर घर मानल्या जाते तसेच येथे मोठ्या प्रमाणात आता आयटी कंपन्याही आहेत. त्यामुळे येथे शिक्षणासाठी आणि कामासाठी मोठ्या प्रमाणात बाहेर गावातून विद्यार्थी आणि मुले हे येतात. त्यामुळे आता येथील PG व्यवसायाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळेतो. पुण्यातील चंदननगर भागात दोन मुली एका ठिकाणी पेईंग गेस्ट म्हणून राहत होत्या. यासाठी त्यांनी घरमालकाला काही पैश्यांचे डिपॉझिटही दिले होते. त्या PG सोडून जात असताना त्यांनी आपण दिलेले डिपॉझिट परत मागितले. यावेळी त्यांना घरमालिकीने घरात कोंडून ठेवून मारहाण केल्याची ( Girls beaten for demanding return of deposit in Pune ) धक्कादायक घटना घडली आहे.

प्रतिक्रिया

चंदनगरमध्ये गुन्हा दाखल -

पेईंग गेस्ट (PG) म्हणून रहात असलेल्या दोन तरुणीना पेईंग गेस्ट चालविणाऱ्या दोन बहिणीनी कोडुंन ठेवून मारहाण केल्याचा घटना ( PG Girls beaten ) घडली आहे. रूम सोडून जात असताना डिपॉझिट परत मागितल्याच्या कारणावरुन भाडेकरूंना घरमालकीनीकड़ून मारहाण झाली आहे. चंदनगरमध्ये हा प्रकार घडला असून चंदननगर पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री उशिरा या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीजीमध्ये राहणाऱ्या मुलीला घरमालकीनीची मारहाण -

पल्लवी चक्रनारायण (वय २०) व रुचिता चक्रनारायण (वय २१) इस पेईंग गेस्ट मारहाण झालेल्या मुलींची नावे आहेत. त्यानी चंदननगर पोलीस ठाण्यात पेईंग गेस्ट मालकिन तृप्ती माने व श्वेता थोरात यांच्या विरुद्ध कोडुंन ठेवून मारहाण केल्याची तक्रार दिली आहे.

मित्राने केली सुटका -

मुळच्या रत्नागिरीच्या असलेल्या या मुली नोकरी तसेच शिक्षणासाठी चंदननगर येथे तृप्ती माने व श्वेता थोरात यांच्याकडे पेईंग गेस्ट म्हणून रहात होत्या. रूम खाली करत असताना चार हजार रुपये डिपॉझिट परत मागितल्याच्या कारणावरुन त्यांना घरात कोडुंन ठेवून मारहाण केली. या मुलींचा मित्र त्यांच्या मदतीला आल्यानंतर या दोघींची सुटका केली.

हेही वाचा -Bihar Blast Update : भीषण स्फोटात 3 मजली इमारत जमीनदोस्त, 8 जणांचा मृत्यू, अनेक ठिगाऱ्याखाली अडकले

Last Updated :Mar 4, 2022, 4:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details