महाराष्ट्र

maharashtra

नियम नसूनही पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांना सॅनिटायझर, मास्क विकत घेण्याची सक्ती

By

Published : Nov 20, 2020, 5:40 PM IST

Updated : Nov 20, 2020, 6:36 PM IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी सॅनिटायझर, मास्क तसेच बॅग सॅनिटायझेशन करून घेणे अशा विविध सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र, हे साहित्य खरेदी करणे प्रवाशांना बंधनकारक नसतानाही पुण्यात ये-जा करणाऱ्या प्रवाशांना रेल्वे प्रशासन या वस्तूंची सक्तीने विक्री करत आहे. तसेच, हे साहित्य जास्त किमतीनेही विकले जात आहे.

पुणे रेल्वे स्थानक न्यूज
पुणे रेल्वे स्थानक न्यूज

पुणे -पुण्याच्या रेल्वे स्थानकावर प्रवाशांना सॅनिटायझर, मास्क तसेच, प्रवाशांच्या बॅग सॅनिटायझेशन करणे सक्तीचे केले आहे. मात्र, रेल्वेने प्रवास करत असताना प्रवाशांना मास्क, सॅनिटायझर विक्री करणे सक्तीचे नसल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे. रेल्वे प्रशासन बळजबळीने प्रवाशांना या वस्तूंची विक्री करत आहे, असा आरोप सामजिक कार्यकर्ते वाजीद खान यांनी केला आहे.

नियम नसूनही पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांना सॅनिटायझर, मास्क विकत घेण्याची सक्ती

हेही वाचा -निवडणूक प्रतिज्ञापत्रात जमीन खरेदीची माहिती लपवली; किरीट सोमैय्यांचा मुख्यमंत्र्यांवर आरोप


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी सॅनिटायझर, मास्क तसेच बॅग सॅनिटायझेशन करून घेणे अशा विविध सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र, हे साहित्य खरेदी करणे प्रवाशांना बंधनकारक नसतानाही पुण्यात ये-जा करणाऱ्या प्रवाशांना रेल्वे प्रशासन या वस्तूंची सक्तीने विक्री करत आहे. तसेच, हे साहित्य जास्त किमतीनेही विकले जात आहे. सामाजिक कार्यकर्ते वाजीद खान यांनी माहिती अधिकाराच्या माध्यमातून माहिती घेतली असता सॅनिटायझर, मास्क, हँड ग्लोज हे साहित्य प्रवाशांना खरेदी करणे सक्तीचे नसल्याची माहिती मिळाली.

नियम नसूनही पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांना सॅनिटायझर, मास्क विकत घेण्याची सक्ती
'रेल्वे प्रशासनाला याबाबत मी तक्रार केली. मात्र, तरीही त्यांच्याकडून काहीही माहिती प्राप्त झाली नाही आणि त्यानंतर मी माहिती अधिकारात माहिती घेतल्यानंतर ही बाब माझ्या निदर्शनास आली आहे. रेल्वे प्रशासन प्रवाशांची लूट करत असून रेल्वेने हे थांबवले पाहिजे,' अशी मागणीही यावेळी वाजीद खान यांनी केली आहे.हेही वाचा -शाळा सुरू होण्यापूर्वी सर्व शिक्षकांना कोरोना चाचणी बंधनकारक
Last Updated : Nov 20, 2020, 6:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details