महाराष्ट्र

maharashtra

पुण्यात कोरोनाचा कहर.. दिवसभरात 1,805 नवे कोरोना पॉझिटिव्ह

By

Published : Jan 5, 2022, 6:56 PM IST

राज्यासह पुणे शहरातही दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. एकीकडे राज्यात ओमायक्रॉनचे वाढत असलेले रुग्ण तर दुसरीकडे कोरोनाच्या देखील वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे पुन्हा चिंतेचं वातावरण निर्माण झाले आहे. पुणे शहरात आज 1,805 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

pune corona update
pune corona update

पुणे - राज्यासह पुणे शहरातही दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. एकीकडे राज्यात ओमायक्रॉनचे वाढत असलेले रुग्ण तर दुसरीकडे कोरोनाच्या देखील वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे पुन्हा चिंतेचं वातावरण निर्माण झाले आहे. पुणे शहरात आज 1,805 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या महिन्याभरातील सर्वाधिक रुग्णसंख्येची नोंद झाली आहे. शहरात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

शहरात दिवसेंदिवस रुग्णसंख्येत वाढ -

पुणे शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. शहरात गेल्या काही महिन्यापासून कोरोनाचे रुग्ण कमी झाले होते. दररोज 100 ते 150 असे रुग्ण आढळून येत होते. मात्र वाढत जाणारी गर्दी, नागरिकांकडून होणारे नियमांचे उल्लंघन यामुळे शहरात आत्ता रुग्णसंख्या वाढायला लागली आहे. शहरात मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्या वाढत आहे. एकीकडे राज्यात ओमायक्रॉनचा धोका तर दुसरीकडे दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या रुग्णसंख्येमुळे चिंतेचं वातावरण निर्माण झाले आहे.

महापालिकेचे प्रसिद्ध पत्रक
शहरात आज 1,805 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण -
पुणे शहरात आज 1805 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात 131 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरात आज कोरोनाने एकही मृत्यू झालेला नाही. शहरातील अॅक्टिव्ह रुग्ण संख्या ही 5,464 इतकी झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details