महाराष्ट्र

maharashtra

Ajit Pawar On 31 December Party : ३१ डिसेंबरला पार्टी करताय.. पहा काय म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार

By

Published : Dec 25, 2021, 7:47 PM IST

३१ डिसेंबर रोजी अनेक जण मोठ्या प्रमाणावर पार्टी करून नववर्षाचे ( New Year Celebrations ) स्वागत करतात. यंदाही गेल्या वर्षीप्रमाणेच नववर्षाच्या स्वागतावर कोरोनाचे सावट ( Covid Threat On New Year ) आहे. त्यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ३१ डिसेंबर रोजी पार्टी करणाऱ्यांना सल्ला दिला ( Ajit Pawar On 31 December Party ) आहे.

अजित पवार
अजित पवार

पुणे - ३१ डिसेंबरला नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेक लोकं हे पार्ट्या ( New Year Celebrations ) करतात. पण पार्ट्या करताना शासनातर्फे ( Maharashtra Covid Guidelines ) जी काही नियमावली देण्यात आली आहे, त्या नियमावलीच आणि साध्या पद्धतीने नवीन वर्षाच स्वागत करावं, असं आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं ( Ajit Pawar On 31 December Party ) आहे. महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेच्या उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ( Minister Aditya Thackeray ) , उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत ( Minister Uday Samant ) आदी मान्यवर उपास्थित होते. यावेळी पवार बोलत होते.

३१ डिसेंबरला पार्टी करताय.. पहा काय म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार

जसा कोरोना बाहेरून आला तसाच ओमायक्रॉनही

ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यात काल रात्रीपासून निर्बंध ( Maharashtra Covid Restrictions ) लावण्यात आले आहेत. कोणतेही कार्यक्रम घेताना कोरोनाच्या नियमांचं पालन करण गरजेचे आहे. सर्वांनी नियमांचं पालन करण हे गरजेचे आहे. कोरोनाचे हे जे नवीन व्हॅरिएंट ( New Covid Variants ) येत आहेत ते अतिशय वेगाने पसरत आहेत. काही ठिकाणी तर हा व्हायरस दीड दिवसात दुप्पट होत आहे. देशात मुंबई आणि दिल्ली ही अशी शहरे आहे जिथं सर्वात जास्त आंतरराष्ट्रीय प्रवासी ( International Passengers Mumbai Delhi ) येत आहेत. त्यामुळे तिथं प्रमाण हे वाढत आहे. काही तालुक्यात जे काही ओमायक्रॉनचे रुग्ण सापडत आहे तिथं परदेशी प्रवासी आले म्हणून पॉझिटिव्ह सापडले आहेत. जस मागे कोरोना बाहेरून आला तसाच ओमायक्रॉनही बाहेरून आला आहे.


अन्यथा याची किंमत मोजावी लागेल

ज्या काही फ्लाईट बाहेरून येत आहेत, त्या सर्वांना 6 दिवस क्वारंटाईन ( Quarantine For International Passengers ) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण काही काही जण दुसऱ्या फ्लाईटने येऊन दुसऱ्या ठिकाणी उतरत आहेत. तेथून डोमेस्टिकने आपल्याकडे येत आहेत. त्यांनी स्वतःची आणि आपल्या परिवाराची काळजी घेतली पाहिजे. असं नाही केलं तर याची किंमत त्यांच्यासह सर्वांना मोजावी लागणार आहे. जे बाहेरून येत आहेत त्यांनी तारतम्य पाळलं पाहिजे, असं देखील यावेळी पवार म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details