महाराष्ट्र

maharashtra

Pune Corona Update : पुणे शहरात बुधवारी 4857 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

By

Published : Jan 12, 2022, 9:31 PM IST

पुणे शहरात आज (12 जानेवारी) 4857 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. शहरात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पुणे शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. शहरात गेल्या काही महिन्यापासून कोरोनाचे रुग्ण कमी झाले होते.

corona file photo
कोरोना फाईल फोटो

पुणे - राज्यासह पुणे शहरातही दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ (Corona Cases in Pune) होताना दिसत आहे. पुणे शहरात आज (12 जानेवारी) 4857 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. शहरात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

  • गेल्या 8 दिवसात आढळले 25 हजार 414 रुग्ण

पुणे शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. शहरात गेल्या काही महिन्यापासून कोरोनाचे रुग्ण कमी झाले होते. दररोज 100 ते 150 असे रुग्ण आढळून येत होते. मात्र, वाढत जाणारी गर्दी, नागरिकांकडून होणारे नियमांचे उल्लंघन यामुळे शहरात आता रुग्णसंख्या वाढायला लागली आहे.

शहरात मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्या वाढत आहे. एकीकडे राज्यात ओमायक्रॉनचा धोका तर दुसरीकडे वाढत जाणाऱ्या रुग्णसंख्येमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरात मागील पाच दिवसांपासून 25 हजार 414 रुग्ण आढळून आले आहेत. आज अखेरीस शहरात 22 हजार 503 एवढे ऍक्टिव्ह रुग्ण झाले आहेत.

  • शहरात आज 4857 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

पुणे शहरात आज 4857 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात 1805 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरात आज कोरोनाने 1 मृत्यू झाला आहे. शहरातील ऍक्टिव्ह रुग्ण संख्या ही 22503 एवढी झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details