महाराष्ट्र

maharashtra

अकबरुद्दीन ओवैसी यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, मनसैनिकांची मागणी

By

Published : May 14, 2022, 5:37 PM IST

Updated : May 14, 2022, 6:16 PM IST

एआयएमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवैसी ( MIM MLA Akbaruddin Owaisi ) यांनी औरंगाबादमध्ये औरंगजेबच्या समाधीचे दर्शन घेऊन त्याच्यावर चादर चढवली. यावर पुण्यामध्ये मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. याबाबत तीव्र निषेध व्यक्त करत ओवैसी यांनी संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी पुण्याचे मनसेचे सरचिटणीस हेमंत संभूस यांनी केली आहे.

ओवैसी
ओवैसी

पुणे- एआयएमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवैसी ( MIM MLA Akbaruddin Owaisi ) यांनी औरंगाबादमध्ये ( Owaisi Aurangabad ) औरंगजेबच्या ( Aurangzeb ) समाधीचे दर्शन घेऊन त्याच्यावर चादर चढवली. यावर पुण्यामध्ये मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. याबाबत तीव्र निषेध व्यक्त करत ओवैसी यांनी संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी पुण्याचे मनसेचे सरचिटणीस हेमंत संभूस यांनी केली आहे.

बोलताना मनसे पदाधिकारी

कोण जातीय तेढ निर्माण करत आहे हे ओवैसींच्या वागण्यावरून दिसत आहे. त्याचा आम्ही पूर्ण निषेध करतो, अशी भावना हेमंत संभूस यांनी व्यक्त केली. औरंगाबादमधील क्रांती चौकात शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, तेथे ओवैसी यांनी एकदाही पुष्पहार अर्पण केलेला नाही. तसेच कधी ते रायगडालही गेलेले नाहीत. मात्र, औरंगजेबाच्या समाधीचे दर्शन घेताना त्यांना लाज वाटली नाही का, अशा तीव्र शब्दात त्यांनी या घटनेचा निषेध केलेला आहे. ओवैसी यांनी संपूर्ण महाराष्ट्राची भावना दुखावली आहे. यामुळे ओवैसी यांनी महाराष्ट्रातील सर्व जनतेची जाहीर माफी मागावी, अशी मागणी संभूस यांनी केलेली आहे.
हेही वाचा -Diffused By Explosion : स्फोट घडवुन ती संशयास्पद वस्तू केली निकामी

Last Updated : May 14, 2022, 6:16 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details