महाराष्ट्र

maharashtra

फेसबुकमुळे झाली पिता-पुत्राची भेट; रस्ता विसरले होते वडील

By

Published : Aug 10, 2019, 5:40 PM IST

Updated : Aug 10, 2019, 7:57 PM IST

सांगवी पोलिसांनी फेसबुकच्या आधारे पिता-पुत्राची भेट घडवली आहे.

सांगवी पोलीस आणि पिता-पुत्र

पुणे -फेसबुकचा योग्य वापर केल्यास काय होऊ शकते याचे उदाहरण सांगवी पोलीस ठाण्यातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी दिले आहे. पोलिसांनी फेसबुकच्या आधारे पिता-पुत्राची भेट घडवली आहे. झेकरिया चेरीयन (५०) आणि राजेश चेरीयन असे पिता पुत्राचे नाव आहे. १५ दिवसांपूर्वी झेकरिया चेरीयन हे त्यांच्या मुलाच्या घराच्या परिसरातून बेपत्ता झाले होते. मात्र, फेसबुकच्या माध्यमातून ते पुन्हा आपल्या मुलाला शोधू शकले आहेत.

फेसबुकच्या आधारे सांगवी पोलिसांनी हरवलेल्या पित्याला त्यांचा मुलगा शोधून दिला आहे.

झेकरिया हे नुकतेच केरळ येथून पिंपरी-चिंचवड येथे मुलाकडे राहण्यासाठी आले आहेत. त्यांना या परिसराची जास्त माहिती नसून त्यांना मराठी आणि हिंदी देखील व्यवस्थित बोलता येत नव्हते. १५ दिवसांपूर्वी झेकरिया हे घराच्या बाहेर पडले आणि काही अंतरावर गेल्यानंतर घराचा पत्ता विसरले. त्यामुळे ते भलत्याच ठिकाणी गेले. त्यांनी घराचा शोध घेतला मात्र, त्यांना घर सापडत नव्हते. ते पायी चालत चालत सांगवी परिसरात तब्बल १० ते १२ किलोमीटर लांब आले. तर मुलगा राजेश तिकडे त्याचा शोध घेत होता. त्याने यासंबंधी निगडी पोलीस ठाण्यात वडील बेपत्ता झाल्याची तक्रारही नोंदवली होती.

शुक्रवारी दुपारी झेकरिया यांना अज्ञात व्यक्तीने पोलीस ठाण्यासमोर सोडले. पोलिसांनी झेकरिया यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी फक्त आपल्या मुलाचे राजेश ऐवढंच नाव घेतले. त्यांना मराठी येत नसल्यामुळे पोलिसांनी त्यांची भाषा समजणाऱ्या व्यक्तीशी त्यांचे बोलणे करुन दिल्यानंतर सर्व हकीकत समोर आली. पोलीस कर्मचारी दत्ता नांगरे यांनी फेसबुकवर राजेश नावाच्या व्यक्तीचा शोध घेतला. त्यामधून त्यांचा मुलाचा शोध घेऊन संपर्क करत पिता पुत्राची भेट घडवली. यावेळी वडिलांना मुलाला पाहून अश्रू अनावर झाले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर शिंदे, पोलीस उपनिरीक्षक विनोद शेंडकर, श्रीकांत पाटील आणि पोलीस नाईक दत्ता नांगरे यांनी ही कामगिरी पार पाडली.

Intro:mh_pun_01_father_and_son_av_mhc10002Body:mh_pun_01_father_and_son_av_mhc10002

Anchor:- सांगवी पोलिसांनी फेसबुकच्या आधारे पिता पुत्रांची भेट घडवली आहे. झेकरिया चेरीयन वय-५० आणि राजेश चेरीयन असे पिता पुत्राचे नाव आहे. १५ दिवसांपूर्वी झेकरिया चेरीयन हे त्यांच्या मुलाच्या घराच्या परिसरातून ते बेपत्ता झाले होते. त्यानंतर त्यांचा शोध घेतला मात्र त्यांचा शोध लागत नव्हता. अखेर निगडी पोलीस ठाण्यात ते बेपत्ता झाल्याची तक्रार मुलाने नोंदवली होती. खर तर फेसबुक चा योग्य वापर केल्यास काय होऊ शकते याचे उदाहरण सांगवी पोलीस ठाण्यातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी दिले आहे. झेकरिया केवळ मुलाचे नाव सांगत होते. तेवढ्याच आधारे पोलिसांनी फेसबुक वर मुलाला शोधले अवघ्या दीड तासात पिता पुत्राची भेट घडवून आणली. मुलाला पाहताच वडील चेरीयन यांना अश्रू अनावर झाले होते. वडील हे नुकतेच केरळ येथून आले असून पिंपरी-चिंचवड परिसराची माहिती नाही. त्यांना मराठी देखील येत नाही, तसेच हिंदी ही व्यवस्थित बोलता येत नाही. १५ दिवसांपूर्वी वडील हे घराच्या बाहेर पडले आणि काही अंतरावर गेल्यानंतर घराचा पत्ता विसरले. त्यामुळे ते भलत्याच ठिकाणी गेले. त्यांनी घराचा शोध घेतला मात्र त्यांना घर सापडत नव्हते. तसेच पायी चालत चालत सांगवी परिसरात तब्बल १० ते १२ किलोमीटर लांब आले. तर मुलगा राजेेेश तिकडे शोध घेेेत होता, शुक्रवारी दुपारी वडील झेकरिया यांना अज्ञात व्यक्तीने तिथे सोडून गेला. पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता तेव्हा राजेश येवढंच नाव त्यांनी घेत होते. त्यांना मराठी येत नव्हती त्यांची भाषा समजणाऱ्या व्यक्तीशी त्यांचं बोलणं करून दिल्यानंतर सर्व हकीकत समोर आली. पोलीस कर्मचारी दत्ता नांगरे यांनी फेसबुकवर राजेश नावाच्या व्यक्तीचा शोध घेतला. त्यामधून त्यांचा मुलाचा शोध घेऊन संपर्क करत पिता पुत्राची भेट घडवली. वडिलांना मुलाला पाहून अश्रू अनावर झाले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर शिंदे, पोलीस उपनिरीक्षक विनोद शेंडकर,श्रीकांत पाटील, पोलीस नाईक दत्ता नांगरे यांनी मोलाची कामगिरी केलीConclusion:
Last Updated : Aug 10, 2019, 7:57 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details