महाराष्ट्र

maharashtra

सोशल मीडियावर झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत महिलेवर बलात्कार

By

Published : Nov 3, 2020, 6:48 PM IST

पुण्यात एका तरुणाने विवाहित महिलेवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

sexual assult
अत्याचार

पुणे - सोशल मीडियावर झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत एका तरुणाने विवाहित महिलेवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात 20 वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक केली आहे. सुरज चंद्रकांत माने असे अटकेत असलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पुण्यातीलच आंबेगाव पठार परिसरात राहणाऱ्या एका महिलेने तक्रार दिली आहे.

भारती विद्यापीठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी तरुणाची पीडित महिलेसोबत व्हॉट्सएपवर ओळख झाली होती. या ओळखूनच त्याने तिला सप्टेंबर महिन्यात भारती हॉस्पिटल परिसरात भेटण्यासाठी बोलावले होते. त्यानंतर त्याने तिला धमकी देऊन एका लॉजवर नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. आरोपी इतक्यावरच थांबला नाही तर त्याने तिचे काही फोटोही काढले आणि हेच फोटो व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने तिच्यावर वारंवार अत्याचार केला.

दरम्यान आरोपीने काही दिवसांपूर्वी फिर्यादी महिलेला लग्नाची मागणी घातली. परंतु महिलेने त्याला नकार दिल्यानंतर तिचे फोटो त्याने सोशल मीडियावर व्हायरल केले. त्यानंतर घाबरलेल्या महिलेने सुरुवातीला सांगलीतील आटपाडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. परंतु बलात्काराचा गुन्हा पुण्यातील भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडला असल्यामुळे हा गुन्हा पुण्यात वर्ग करण्यात आला. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details