महाराष्ट्र

maharashtra

Mahatma Gandhi birth anniversary : पुण्यातील आगाखान पॅलेस आणि महात्मा गांधी; पहा काय होत्या आठवणी

By

Published : Oct 2, 2022, 12:55 PM IST

Updated : Oct 2, 2022, 7:40 PM IST

महात्मा गांधी जयंतीच्या ( Mahatma Gandhi birth anniversary ) निमत्ताने पुण्यातील ऐतिहासिक आगाखान पॅलेस ( agakhan palace pune ) आणि महात्मा गांधी ( Mahatma Gandhi ) यांचा काय संबंध होता. आगाखान पॅलेसमध्ये महात्मा गांधी यांच्या अनेक आठवणी आहेत. याच आठवणी आज आपण पाहणार आहोत.

Mahatma Gandhi birth anniversary
महात्मा गांधी जयंती

पुणे : महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता ( Father of the Nation Mahatma Gandhi ) म्हणून सर्वत्र संबोधले जाते. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आणि ब्रिटिशांच्या तावडीतून देशाची सुटका करण्यासाठी महात्मा गांधी यांनी मोलाचे कार्य पार पाडले आहे. परंतु या सर्व गोष्टी करताना गांधीजींच्या समोर अनेक आव्हाने सुद्धा उभी होती. तरीही महात्मा गांधीजी यांनी कधीच हार न मानत त्याला सामोरे जाण्याची जिद्द आणि एकनिष्ठा दाखवत अहिंसा आणि सत्याग्रहाच्या मार्गाने आपले काम सुरुच ठेवले होते आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. २ ऑक्टोंबरला महात्मा गांधी जयंती ( 2 October Mahatma Gandhi Jayanti ) सर्वत्र साजरी केली जाते. महात्मा गांधी जयंतीच्या ( Mahatma Gandhi birth anniversary ) निमत्ताने पुण्यातील ऐतिहासिक आगाखान पॅलेस आणि महात्मा गांधी यांचं काय संबंध होता. आगाखान पॅलेस ( agakhan palace pune ) मध्ये महात्मा गांधी यांच्या अनेक आठवणी आहेत.

महात्मा गांधी जयंती


1942 मध्ये महात्मा गांधी यांना याच आगाखान पॅलेसमध्ये नजरकैद करण्यात आलं :आगाखान पॅलेस ही ऐतिहासिक इमारत आहे, ही इमारत पुण्याच्या येरवडा येथे आहे. ही इमारत सुलतान मुहम्मद शाह आगाखान तृतीय यांनी 1892 मध्ये बनविली होती. १९४२ मध्ये चलेजाव चळवळ सुरू झाल्यावर सरकारने महात्मा गांधीजी, कस्तुरबा गांधीजींचे स्वीय सचिव महादेवभाई देसाई आणि प्यारेलाल तसंच काही काळानं गांधीजींच्या शिष्या मीराबेन आणि वैद्यकीय सल्लागार डॉ. एम. डी. डी. गिल्डर यांनाही या पॅलेसमध्ये नजरकैद ठेवण्यात आले. जयप्रकाश नारायण यांच्या पत्नी प्रभावती, सरोजिनी नायडू यांनाही काही काळ येथे ठेवण्यात आले होते. 10 ऑगस्ट १९४२ पासून गांधीजींची कैद सुरू झाली. पुण्यातील ब्रिटिशांच्या दडपशाहीच्या विरोधात गांधीजींनी येथेच उपवास सुरू केला. तब्बल 21 महिने महात्मा गांधी याच आगाखान पॅलेसमध्ये नजरकैद होते. 6 मे 1944 साली महात्मा गांधी यांना सोडण्यात आलं होत.

कस्तुरबा यांना कॅरम मधील राणी मिळाली नाही की, याची तक्रार महात्मा गांधी यांना करत असतं :महात्मा गांधी हे नजरकैद असताना आगाखान पॅलेसमध्ये ते दररोज सकाळी लवकर उठून ध्यान करने, प्रार्थना करणे तसेच पुस्तक लिहिणे अस त्यांचं राहणीमान होत. महात्मा गांधी यांनी आरोग्याची चाबी हे पुस्तक आगाखान पॅलेसमध्ये लिहिलं आहे. तसेच या ठिकाणी गांधीजी हे त्यांच्या पत्नी कस्तुरबा यांना लिहायला तसेच वाचायला शिकवत होत्या. तसेच अनेक लोकांना पत्रव्यवहार अस काम महात्मा गांधी हे करत असे. तसेच महात्मा गांधी पॅलेसमध्ये असताना कस्तुरबा आणि मिराबेन ह्या कॅरम खेळत होते. कॅरम खेळत असताना जर कस्तुरबा यांना राणी मिळत नसेल तर ते खूप चिडचिड करत असे, त्याची तक्रार महात्मा गांधी यांना करत होते. तसेच महात्मा गांधी हे कस्तुरबा यांना कविता म्हणायला देखील शिकवत होते. अशा अनेक आठवणी गाईड निलम महाजन यांनी यावेळी सांगितल्या.


आगाखान पॅलेस मध्ये महात्मा गांधी यांचे दोनदा वाढदिवस झाले साजरा : महात्मा गांधी आगाखान पॅलेसमध्ये बंदिस्त असताना त्यांचे दोन वेळा वाढदिवस ही या पॅलेसमध्ये साजरा करण्यात आले. महात्मा गांधी यांची ईच्छा नव्हती की, त्यांचा वाढदिवस हे साजरा व्हावा. पण पॅलेसमध्ये असणाऱ्या लोकांनी महात्मा गांधी यांचा वाढदिवस साजरा केला. एकदा तर दोन ऑक्टोबर च्या मध्यरात्रीच पॅलेसमध्ये बकरी आणण्यात आली आणि जेव्हा महात्मा गांधी उठले तेव्हा त्यांना त्या बकरीच दूध उकळून देण्यात आलं आणि याच दिवशी सरोजिनी नायडू यांनी जेवण बनविले. त्यात कोबीच सूप, उकळलेल्या भाज्या आणि खजूर अस सात्विक जेवण गांधीजींसाठी बनविण्यात आले होते.


आगाखान पॅलेस चा इतिहास काय :नामदार सुलतान मुहम्मद शाह आगाखान यांनी 1892 मध्ये हे आगाखान पॅलेस बनविले आहे. ही इमारत 6.5 हेक्टयर मध्ये पसरलेली आहे. 1892 मध्ये या इमारतीला आगाखान तृतीय यांनी बनविले होते. हे पॅलेस तेव्हा 12 लाख रुपये एवढं खर्च करून बांधण्यात आलं होत. सुमारे 1956 पर्यंत ही इमारत त्यांच्याच जवळ होती. नंतर 1969 मध्ये आगाखान चतुर्थ यांनी भारत सरकारला देणगी स्वरूपात दिली. २१ मीटर रुंद आणि ७२ मीटर लांब अशी ही ऐसपैस वास्तू आहे. वास्तूचे प्रवेशद्वार उत्तरेला आहे. तळमजला १७५६ चौरस मीटर, पहिला मजला १०८० चौ.मी., दुसरा मजला ४४५ चौ.मी. आहे. गच्ची व कौलारू छपरे यांमुळे वास्तूला देखणेपण प्राप्त झाले आहे. वास्तूमध्ये ब्रिटिश, मुस्लिम, इटालियन, रोमन, फ्रेंच अशा विविध बांधकाम शैलींचा संगम दिसतो. सुरुवातीला दिवाणखाने, हमामखाने, पाहुण्यांची निवासस्थाने, असेंब्ली हॉल बांधण्यात आले. पुढे समाधीस्थळ, अन्य कर्मचाऱ्यांची निवासस्थाने यांची भर या पॅलेसमध्ये आहे.


आगाखान महाल आणि महात्मा गांधी :ऑगस्ट 1942 ते मे 1944 पर्यंत आपल्या तुरुंगवासाच्या काळात महात्मा गांधी याच महालात आपल्या पत्नी कस्तुरबा, सहायक महादेव देसाई आणि स्वातंत्र्य वीर नायडू यांच्या समवेत राहिले. कस्तुरबा आणि महादेव देसाई यांचे निधन याच महालात तुरुंगवासाच्या काळातच झाले. महालाच्या एका कोपऱ्यात या दोघांची समाधी आहे. वास्तविक ते समाधी स्थळ नसून त्या स्थळी कस्तुरबा गांधी आणि देसाई यांचे दाह संस्कार केले होते. त्या जागी तुळशीचं रोपटं लावले आहे. कस्तुरबा गांधींच्या समाधी स्थळाच्या जवळच्या लाल भिंतीवर त्यांना एक मराठी कविता लिहून समर्पित केली आहे.


गांधी संग्रहालय :गांधीजी ज्या खोल्यांचा वापर करायचे त्यांना आता संग्रहालयात रूपांतरित केले आहेत. या खोल्या साधारण आणि स्वच्छ आहेत. त्यामध्ये गांधीजींच्या वापरण्यातल्या वैयक्तिक वस्तू भांडी, चपला, कपडे आणि पत्र ठेवले आहेत. महालात प्रवेश करताच एका मोठ्या खोलीत गांधींजींचा पुतळा आहे. गांधीजींचे मोठे चित्र असे बनविले आहे, जणू ते जिवंतच आहे. महात्मा गांधींजींच्या स्वातंत्र्य चळवळीतील काही छाया चित्रे देखील इथे आहेत. दुसऱ्या खोलीत चित्राच्या माध्यमातून गांधीजींनी एका लहान मुलाला आपल्या मांडीवर घेतलेले दर्शविले आहे. या इमारतीत रंगबेरंगी चित्रांच्या माध्यमातून गांधीजींच्या आयुष्यातील घटनांना चित्रित केले आहे. एका खोलीत खोलीच्या मधोमध एक गोल टेबल सात खुर्च्यांसह ठेवलेले आहे. त्या खोलीत देखील चित्र आहेत. ते सुरक्षित ठेवले आहे, जेणे करून कोणी त्यांना स्पर्श करू नये.


आगा खान पॅलेस मध्ये साजरे केले जाणारे उत्सव :
24 जानेवारी - राष्ट्रीय बालिका बाल दिन
26 जानेवारी - प्रजासत्ताक दिन
30 जानेवारी - गांधीजींची पुण्यतिथी
8 मार्च - महिला दिन
15 ऑगस्ट - स्वातंत्र्य दिन
2 ऑक्टोबर - गांधी जयंती
14 नोव्हेंबर - बालदिन
महाशिवरात्री इत्यादी सण साजरे केले जातात.

Last Updated :Oct 2, 2022, 7:40 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details