महाराष्ट्र

maharashtra

Ajit Pawar On Lockdown : "... तर लॉकडाऊन बाबत मुख्यमंत्री कठोर निर्णय घेण्याची शक्यता", अजित पवारांचा इशारा

By

Published : Jan 15, 2022, 2:01 PM IST

Updated : Jan 15, 2022, 3:41 PM IST

Ajit Pawar
Ajit Pawar

मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कठोर निर्णय घेण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा इशारा अजित पवार यांनी दिला आहे.

पुणे -गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने ( Maharashtra Corona Increased ) वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी लॉकडाऊन बाबत इशारा दिला आहे. राज्यात जर ७०० मेट्रीक टन पेक्षाही जास्त ऑक्सिजनची मागणी होत असेल. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Cm Uddhav Thackeray ) कठोर निर्णय घेण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे अजित पवार ( Ajit Pawar On Maharashtra Lockdown ) यांनी म्हटले.

पुण्यात अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधाला. त्यावेळी बोलताना पवार म्हणाले की, "कोरोना संदर्भातील राज्य स्तरावरील निर्णय हे राज्य प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतात. रुग्ण वाढत आहे. बहुतेक जण घरीच थांबून उपचार घेत आहेत. याबाबत केंद्र सरकार व राज्य सरकारचा आरोग्य विभागही वेळोवेळी माहिती देत आहे. मात्र, हे सगळे होत असताना उद्या जर ऑक्सिजन बेड्सची मागणी मोठ्या प्रमाणावर सुरू झाली. तसेच, ७०० मेट्रीक टनापेक्षा जास्त ऑक्सिजनची राज्यात मागणी झाली तर, त्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कठोर निर्णय घेण्याची शक्यता नाकारता येत नाही," असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

अजित पवार प्रसारमाध्यमांना संवाद साधताना

लवकरच बँकेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष जाहीर करू

पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष ठरवण्यासाठी आम्ही आज बैठक बोलावली होती. यात सगळ्यांची मते जाणून घेण्यात आली. याबाबत मी, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि राज्यमंत्री दत्तात्रय भरणे आम्ही एकत्रित निर्णय घेऊ. आणि लवकरच पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष जाहीर करू, असेही अजित पवार ( Ajit Pawar On Pune District Bank ) यांनी सांगितले.

आरोपींवर कठोर कारवाई

माझ्या नावाने ज्या बांधकाम व्यावसायिकाला फोन करण्यात आला ते अतुल गोयल मला ओळखतात. त्यांना ठाऊक आहे की माझा फोन गेला की पलीकडच्या व्यक्तीला प्रायव्हेट नंबर आल्याचे दिसते. त्यामुळे त्यांनी मला फोन केला. त्यासंदर्भात मी गृहमंत्री वळसे पाटील यांना सांगितले आणि सायबर पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर त्या आरोपींना अटक केली असून, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही पवार म्हणाले.

हेही वाचा -Ajit Pawar In Pune : आसाम मध्ये अडकलेल्या मुलांसाठी अजित पवारांच्या आदेश, म्हणाले "काहीही करा पण..."

Last Updated :Jan 15, 2022, 3:41 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details