महाराष्ट्र

maharashtra

किरण गोसावीने शरण येण्यासाठी संपर्क साधला नाही - पुणे पोलीस

By

Published : Oct 25, 2021, 7:06 PM IST

किरण गोसावीवर फरासखाना पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. यात एक महिला आरोपीला अटक करण्यात आली आहे. गोसावीने शरण येण्याबाबत कोणताही संपर्क पुणे पोलिसांशी साधलेला नाही. पुणे पोलिसांचे दोन पथक राज्याबाहेर त्याच्या शोध घेत आहेत, अशी माहिती सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर यांनी दिली.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र

पुणे- किरण गोसावीवर फरासखाना पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. यात एक महिला आरोपीला अटक करण्यात आली आहे. गोसावीने शरण येण्याबाबत कोणताही संपर्क पुणे पोलिसांशी साधलेला नाही. पुणे पोलिसांचे दोन पथक राज्याबाहेर त्याच्या शोध घेत आहेत, अशी माहिती सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर यांनी दिली.

बोलताना सहायक पोलीस आयुक्त

गोसावीची महिला सहकारी यापूर्वीच अटकेत

फसवणुकीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या किरण गोसावीच्या महिला सहकारी यापूर्वी पुणे पोलिसांनी अटक केली आहे. शेरबानो कुरेशी, असे त्या महिलेचे नाव आहे. शेरबानो कुरेशीसह गोसावीने पुण्यातील तरुणाची तीन लाखांची फसवणूक केली होती. गोसावी विरोधात पुणे पोलिसांनी लुकआऊट नोटीस जारी केली आहे. ड्रग्स प्रकरणी आर्यन खानसह इतर जणांना अटक केलेल्या प्रकरणात किरण गोसावी हा पंच आहे.

फरासखाना पोलीस ठाण्यात दाखल आहे गुन्हा

पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात 2018 मध्ये किरण गोसावी आणि तिची महिला सहकारी शेरबाने कुरेशी या दोघांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता. याच गुन्ह्यात पुणे पोलिसांनी कुरेशीला मुंबईतून अटक केली आहे. महाराष्ट्राबरोबरच इतर राज्यांमध्ये किरण गोसावीचा शोध घेतला जात आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

किरण गोसावी याने 2018 मध्ये आपल्या फेसबुक अकाऊंटवर मलेशियात हॉटेलमध्ये नोकरीची संधी असण्यासंदर्भात पोस्ट टाकली होती. त्या पोस्टवर चिन्मय देशमुख या तरुणाने प्रतिसाद दिला होता. त्यांच्याकडून तीन लाख रुपये घेऊन गोसावीने त्याला मलेशियाला पाठविले. मात्र, तेथे नोकरी न दिल्याने तो भारतात परत आला. त्यानंतर त्याने फरासखाना पोलिसांकडे तक्रार दिली होती. या गुन्ह्यात गोसावी फरार आहे. त्यामुळे फसवणुकी संदर्भात फरासखाना पोलीस किरण गोसावीचा शोध घेत आहेत. तक्रारदार चिन्मय देशमुख याच्या माहितीनुसार गोसावीने आपल्यासह पालघर, मुंबई, आंध्र प्रदेश येथील अनेकांची नोकरीच्या आमिषाने फसवणूक केली आहे. दिल्लीतील तरुणांनाही त्याने फसविले आहे. त्यामुळे दिल्ली पोलीसही त्याच्या मागावर आहेत.

किरण गोसावी विरोधात लुकआऊट नोटीस

सध्या संपूर्ण देशात गाजत असलेल्या आर्यन खान ड्रग्स केसमध्ये किरण गोसावी हा मुख्य साक्षीदार आहे. मात्र, गोसावी पुण्यातील एका गुन्ह्यात फरार आरोपी असल्याची बाब समोर आली आहे. गोसावी विरोधात पुणे पोलिसांनी लुकआऊट नोटीस जारी केली आहे. गोसावी सापडत नसल्याने त्याला पुणे पोलिसांनी फरार घोषित केले होते.

नेमका कोण आहे के. पी. गोसावी..?

किरण गोसावी देश-परदेशात नोकरी मिळवून देणाऱ्या के.पी.जी. ड्रीम्ज रिक्रूटमेंट कंपनीचे मालक असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे के.पी.जी. ड्रीम्ज कंपनीचे मुंबई आणि नवी मुंबईत कार्यालय आहे. बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात, खासगी गुप्तहेर अशीही के.पी.गोसावी याची ओळख आहे. गोसावी स्वत:च्या वाहनावर पोलिसांची पाटी लावून फिरताना कॅमेऱ्यात कैद असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवाय नवाब मलिक यांनीही तसा दावा केला आहे.

हे ही वाचा -EXCLUSIVE: समीर वानखेडे यांच्या मूळ गावी ईटीव्ही भारत, कुटुंबांनी नावाबाबत दिले 'हे' स्पष्टीकरण

ABOUT THE AUTHOR

...view details