महाराष्ट्र

maharashtra

Narayan Rane On Devendra Fadnavis : 'मी केंद्रात कॅबिनेट मंत्री आहे... व्हाया देवेंद्र फडणवीस'

By

Published : Dec 6, 2021, 1:10 PM IST

Updated : Dec 6, 2021, 3:36 PM IST

सिम्बॉयसेस विद्यापीठाच्या माध्यमातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन ( Mahaparinirvana Day celebrated at Symbiosis University ) सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी मंत्री नारायण राणे बोलत होते. ते म्हणाले की, 'हे मंत्रीपद मला देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मिळालेले आहे.'

Narayan Rane About Devendra Fadnavis
महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन सभा

पुणे - केंद्रीय मंत्री नारायण राणे हे नेहमीच विविध विषय मांडून चर्चेत असतात. कधी शिवसेनेवर परखड टीका तर कधी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत असतात. पण आज पुण्यात झालेल्या कार्यक्रमात त्यांनी थेट केंद्रीय मंत्रीपदाबाबत एक गौप्यस्फोट केला आहे. ते म्हणाले की, 'हे मंत्रीपद मला देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मिळालेले आहे.'

नारायण राणे कार्यक्रमात बोलताना

काय म्हणाले राणे? -

सूत्रसंचालन करत असताना माझा उल्लेख हा केंद्रीय मंत्री होतो. सांगितले जाते की राणे हे केंद्रात कॅबिनेट मंत्री आहे व्हाया देवेंद्र फडणवीस... ( Narayan Rane About Devendra Fadnavis ) त्यांनी आम्हाला सांगितले की दिल्लीला जा आणि सुखी रहा. आम्ही आदेश पाळला. भारतीय जनता पार्टीत आदेश पाळतात. मी आदेश पाळला आणि आज सुखी आहे. 4 महिन्यात 8 ते 9 राज्य करत मी आज 4 महिन्यांनी पुण्यात आलो आहे, असे यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सांगितले.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन -

सिम्बॉयसेस विद्यापीठाच्या ( Mahaparinirvana Day celebrated at Symbiosis University ) माध्यमातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ( Dr. B.R. Ambedkar mahaparinirvan divas ) अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी मंत्री नारायण राणे बोलत होते.

हेही वाचा -Omicron Variant - विदेशातून येणाऱ्या लोकांबाबत केंद्र सरकारने कठोर भूमिका घ्यायला हवी -अजित पवार

Last Updated : Dec 6, 2021, 3:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details