महाराष्ट्र

maharashtra

कोल्हापुरात जोरदार पाऊस ; प्रचार फेऱ्यांमध्ये पावसाचा व्यत्यय

By

Published : Oct 18, 2019, 8:26 PM IST

कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. याचा परीनाम प्रचारफेऱ्यांवर झाला.

कोल्हापुरात जोरदार पाऊस

कोल्हापूर - जिल्ह्यातील अनेक भागात आज सायंकाळी जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतातील पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान तर झालेच शिवाय निवडणुकीच्या प्रचार फेऱ्यांवरही त्याचा परिणाम झाला. सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. पावसामुळे शेतात उभ्या असलेल्या आणि कापणीला आलेल्या भात पिकाचे सुद्धा नुकसान झाले. कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांना आधीच महापूराचा मोठा फटका बसलाय त्यात आता या अवकाळी पावसाने भर घालून शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखीनच भर घातली आहे. या अवकाळी पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले असून याचा परिणाम प्रचारफेऱ्यांवरसुद्धा पडला आहे. प्रचाराला अवघे काही तासच उरले असताना लागलेल्या जोरदार पावसाने उमेदवारांच्या चिंतेत सुद्धा वाढ केली आहे.

कोल्हापुरात जोरदार पाऊस
Intro:कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक भागात आज सायंकाळी जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतातील पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान तर झालेच शिवाय निवडणुकीच्या प्रचार फेऱ्यांवरही त्याचा परिणाम झालाय. सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. पावसामुळे शेतात उभी असलेल्या आणि कापणीला आलेल्या भात पिकाचे सुद्धा नुकसान झालेय. कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांना आधीच महापूराचा मोठा फटका बसलाय त्यात आता या अवकाळी पावसाने भर घालून शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखीनच भर घातली आहे. या अवकाळी पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले असून याचा परिणाम प्रचारफेऱ्यांवरसुद्धा पडला आहे. प्रचाराला अवघे काही तासच उरले असताना लागलेल्या जोरदार पावसाने उमेदवारांच्या चिंतेत सुद्धा वाढ केली आहे.


Body:.


Conclusion:.

ABOUT THE AUTHOR

...view details