महाराष्ट्र

maharashtra

Ganesh Chaturthi 2022 : अष्टविनायक आणि सिद्धिविनायकामधील फरक माहितीये का? चला तर मग जाणून घेऊया...

By

Published : Aug 30, 2022, 7:54 PM IST

आज आपण 'अष्टविनायक' आणि 'सिद्धिविनायक' यामध्ये नेमका काय फरक difference Ashtavinayaka and Siddhivinayaka आहे, हे जाणून घेणार आहोत. अष्टविनायकाला स्वतंत्र इतिहास आहे. अष्टविनायकाची प्रतिकृती तसेच मंदिरे राज्यात ही कुठेही पाहायला मिळत नाहीत. तर सिद्धिविनायकाची प्रतिकृती तसेच मंदिरे हे राज्यभर ठिकठिकाणी पाहायला मिळतात. हा यातील एक मुख्य फरक आहे. याबाबत पंडित वसंतराव गाळगीळ यांनी सविस्तर माहीती दिलेली आहे, पाहूया काय सांगतात ते.Ganesh Chaturthi 2022

Ganesh Chaturthi 2022
अष्टविनायक आणि सिद्धिविनायक मधील फरक

पुणे उद्यापासून सर्वत्र गणेश उत्सवाला सुरुवात होत आहे. यंदा मोठ्या उत्साहात गणेश उत्सव हे साजरा होत आहे.अष्टविनायक म्हणजे महाराष्ट्रातील आठ मानाची व प्रतिष्ठेची गणपतीची मंदीरे आहेत. तर सिद्धिविनायक मंदिराला देखील तेवढेच महत्त्व आहे. आज आपण 'अष्टविनायक' आणि 'सिद्धिविनायक' यामध्ये नेमका काय फरक difference Ashtavinayaka and Siddhivinayaka आहे, हे जाणून घेणार आहोत. अष्टविनायकाला स्वतंत्र इतिहास आहे. अष्टविनायकाची प्रतिकृती तसेच मंदिरे राज्यात ही कुठेही पाहायला मिळत नाहीत. तर सिद्धिविनायकाची प्रतिकृती तसेच मंदिरे हे राज्यभर ठिकठिकाणी पाहायला मिळतात. हा यातील एक मुख्य फरक आहे.Ganesh Chaturthi 2022

प्रतिक्रिया देतांना पंडित वसंतराव गाळगीळ


अष्टविनायक देवळेपश्चिम महाराष्ट्र व कोकणात असलेल्या ह्या देवळांना स्वतंत्र इतिहास आहे. या सर्व देवळांना पेशव्यांचा आश्रय असल्यामुळे, त्यांना पेशवाईच्या काळात महत्त्व प्राप्त झाले. मुद्गल पुराणातही अष्टविनायकांचे वर्णन आढळते. श्री गणपतीची महाराष्ट्रातील प्रत्येक गावात एक दोन मंदिरे हमखास पाहण्यास मिळतात. त्या मंदिरांतून गणेशाची हजारो रूपे भाविक अनुभवतात. असे असले तरी, महाराष्ट्रातील या विशिष्ट आठ ठिकाणच्या गणेश मंदिरांना, मूर्तींना खास महत्त्व आहे. या आठ मंदिरांना मिळून ‘अष्टविनायक’ म्हटले जाते. गणपतीच्या अनेक नावांपैकी एक नाव म्हणजे विनायक; म्हणूनच या मंदिरांचा संच म्हणजे अष्टविनायक. अष्टविनायकांची मंदिरे (स्थळे) महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहेत. गणपती ही विद्येची देवता असून तो, सुखकर्ता, दुःखहर्ता आणि रक्षणकर्ता आहे ,अशी गणेश भक्तांची भावना आहे.



तर प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायकाचे सुप्रसिध्द मंदिर बृहन्मुंबईतील अत्यंत लोकप्रिय आणि जागृत देवस्थान आहे. संपूर्ण भूतलावर पसरलेल्या लक्षावधी भक्तांचे हे श्रद्धास्थान आहे. हे देवस्थान पुरातन असून, कार्तिक शुद्ध चतुर्दशी शालिवाहन षके १७२३ (सन १८०१) मध्ये पहिला जीर्णोद्धार-नूतनीकरण विधीपूर्वक श्री. लक्ष्मण विठू पाटील यांच्या मार्फत संपन्न झाले होते, असे उपलब्ध माहितीवरून दिसून येते .श्री सिद्धिविनायक हे मंदिर गेल्या दोनशे वर्षांपासून येथे अस्तित्वात असल्याचे यावरून स्पष्ट होते. मुंबईतील बाणगंगा संकुलात आगदी आशीच संगमरवरी मूर्ती अस्तित्वात आहे. या दोन्ही मूर्ती एकाच कारागिराने घडवल्या असाव्यात. बाणगंगा देवस्थान संकुल ५०० वर्षांहून अधिक जुने आहे, हे लक्षात घेता प्रभादेवी मंदिरातील मंदिराची रचना सुमारे ५०० वर्षे इतकी पुरातन असावी, असे म्हणता येईल.



एकूणच अष्टविनायक आणि सिद्धिविनायक या मध्ये काय काय फरक आहे; याबाबत पंडित वसंतराव गाळगीळ यांनी माहिती दिली आहे. पाहूया काय सांगतात ते. Ganesh Chaturthi 2022. difference Ashtavinayaka and Siddhivinayaka

हेही वाचाGaneshotsav 2022 अष्टविनायकापैकी एक आहे थेऊरचा चिंतामणी, जाणून घ्या कसे पडले हे नाव

ABOUT THE AUTHOR

...view details