महाराष्ट्र

maharashtra

Pimpri Chinchwad Ganeshotsav : गणेश मूर्तीचे दर 30 ते 35 टक्क्यांनी वाढले; पेट्रोल, डिझेल, जीएसटी दरवाढीचा फटका

By

Published : Aug 8, 2022, 2:30 PM IST

Updated : Aug 8, 2022, 3:02 PM IST

या वर्षी गणेश उत्सवावरील ( Ganeshotsav ) निर्बंध नवीन सरकारने हटवले आहेत. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे गणेश उत्सव जोरात होणार आहे. आतापासूनच गणेशमूर्तीची ( Ganesh Idol ) बुकिंग करण्यासाठी गणेशभक्त गणेशमूर्ती कारखान्यात गर्दी करताहेत. परंतु, पेट्रोल, डिझेलचे दर वाढल्याने याचा थेट फटका गणेशभक्तांना ( Ganesha Devotees ) बसला आहे. कारण या वर्षी गणेशमूर्तींचे 30 ते 35 टक्क्याने दर वाढले आहेत. महागाई वाढली तरी उत्सव जोमाने करू, अशी प्रतिक्रिया गणेशभक्त देत आहेत.

Ganeshotsav Festival
गणेशोत्सव

पिंपरी-चिंचवड / पुणे : दोन वर्षांनंतर मोठ्या उत्साहात गणेशोत्सव ( Ganeshotsav ) साजरा केला जाणार आहे. या वर्षी उत्सवावर कुठलेही निर्बंध नाहीत. त्यामुळे आतापासूनच गणेशमूर्तीची ( Ganesh Idol ) बुकिंग करण्यासाठी गणेशभक्त गणेशमूर्ती कारखान्यात गर्दी करताहेत. परंतु, पेट्रोल, डिझेलचे दर वाढल्याने याचा थेट फटका गणेशभक्तांना बसला आहे. कारण या वर्षी गणेशमूर्तींचे 30 ते 35 टक्क्याने दर वाढले आहेत. यामुळे गणेशभक्तांमध्ये ( Ganesha Devotees ) काही प्रमाणात नाराजी आहे. महागाई वाढली तरी उत्सव जोमाने करू, अशी प्रतिक्रिया गणेशभक्त देत आहेत.

गणेशोत्सव

मूर्तीचे बुकींग सुरू झाले : दोन वर्षानंतर मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. तशी तयारीदेखील पाहायला मिळत आहे. कोरोना काळात अनेकांनी साध्या पद्धतीने गणपती उत्सव साजरा केला. जिथे 5 ते 6 फुटांची गणेशमूर्ती होते, तिथे दीड-दोन फुटांच्या मूर्ती बसवल्या गेल्या. या वर्षी नागरिकांमध्ये उत्साह आहे. मूर्तींचे बुकिंग सुरू झाले आहे. असे कारखानदार रवींद्र चित्ते यांनी सांगितलं आहे.


पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे दर वाढले : गणेशमूर्ती बनवण्याचे मटेरियल हे राजस्थान येथून येते. मटेरियलचे भाव वाढले आहेत. पेट्रोल, डिझेलचे दर वाढल्याने वाहतुकीच्या खर्चात आणखी भर पडली. कामगारांचे पगारदेखील वाढले आहेत. जीएसटीचादेखील फटका बसला आहे. यामुळे या वर्षी गणपती बाप्पांच्या मूर्तीच्या दरात 30 ते 35 टक्क्याने दरवाढ झाली आहे, असे कारखानदार, मूर्तिकार रवींद्र चित्ते यांनी ई-टीव्ही भारतशी बोलताना सांगितले आहे. गणेशमूर्तीची बुकिंग करण्यासाठी अनेक गणेशभक्त गर्दी करीत आहेत. परंतु, या वर्षी गणेशमूर्तीचे दर वाढल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा : TET Scam in Maharashtra : मला बदनाम करण्याचे षडयंत्र : टीईटी प्रश्नावर अब्दुल सत्तार यांचे स्पष्टीकरण

Last Updated :Aug 8, 2022, 3:02 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details