महाराष्ट्र

maharashtra

गावठी पिस्तुलासह सराईत गुन्हेगार सांगवी पोलिसांच्या ताब्यात

By

Published : Oct 1, 2019, 8:01 AM IST

गावठी पिस्तुलासह जिवंत काडतुस बाळगणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला सांगवी पोलिसांनी अटक केली आहे. आश्विन आनंदराव चव्हाण (१९) असे गुन्हेगाराचे नाव असून, त्याच्यावर याआधीही अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती सांगवी पोलिसांनी दिली आहे.

गावठी पिस्तुलासह जिवंत काडतुस बाळगणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला सांगवी पोलिसांनी अटक केली

पुणे - गावठी पिस्तुलासह जिवंत काडतुस बाळगणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला सांगवी पोलिसांनी अटक केली आहे. आश्विन आनंदराव चव्हाण (१९) असे गुन्हेगाराचे नाव असून, त्याच्यावर याआधीही अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती सांगवी पोलिसांनी दिली आहे.

गावठी पिस्तुलासह जिवंत काडतुस बाळगणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला सांगवी पोलिसांनी अटक केली

हेही वाचा रावण टोळीतील दोन गुन्हेगारांना अटक; दोन पिस्तुलसह तीन जिवंत काडतुसे हस्तगत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगवी पोलीस ठाण्यातील काही कर्मचारी हे परिसरात खासगी वाहनाने गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस कर्मचारी नितीन दांडगे यांना बातमीदारामार्फत आश्विन मयुरी नगरी येथील परिसरातील रस्त्यावर थांबला असल्याची माहिती मिळाली. त्याच्याजवळ एक गावठी पिस्तुल व जिवंत काडतुस असल्याची खात्री झाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक यशवंत साळुंके यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली एक टीम तयार करून आरोपीला बेड्या ठोकल्या.

पोलीस अद्याप अधिक तपास करत आहेत. संबंधित कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, अजय भोसले यांनी केली आहे.

Intro:mh_pun_02_av_sangavi_crime_mhc10002Body:mh_pun_02_av_sangavi_crime_mhc10002

Anchor:- गावठी पिस्तुल आणि जिवंत काडतुस बाळगणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला सांगवी पोलिसांनी जेरबंद केले आहे. या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे. आश्विन आनंदराव चव्हाण वय-१९ अस अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. अशी माहिती सांगवी पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगवी पोलीस ठाण्यातील काही पोलिस कर्मचारी हे परिसरात खासगी वाहनाने गस्त घालत होते. तेव्हा, पोलिस कर्मचारी नितीन दांडगे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, आरोपी आश्विन हा मयुरी नगरी येथील परिसरातील रोडवर थांबला आहे. त्याच्या कंबरेला एक गावठी पिस्तुल आणि जिवंत काडतुस असल्याची खात्री लायक माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक यशवंत साळुंके यांनी वरीष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली एक टीम तयार करून खरच संबंधित ठिकाणी आरोपी असल्याची खात्री करून आरोपी आश्विन ला ताब्यात घेतले. त्याची अंग झडती घेण्यात आली त्याच्याकडे एक गावठी पिस्तुल आणि जिवंत काडतुस मिळाले आहे. आश्विन हा सराईत गुन्हेगार आहे त्याच्या अनेक गुन्हे दाखल आहेत अशी माहिती सांगवी पोलिसांनी दिली. सदर ची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, अजय भोसले गुन्हे पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत पाटील, यशवंत साळुंके, पोलीस कर्मचारी नितीन दांडगे, कैलास केंगले, चंद्रकांत भिसे, दीपक पिसे, हेमंतकुमार गुत्तीकोंडा, अनिल देवकर यांनी केली आहे. Conclusion:

ABOUT THE AUTHOR

...view details