महाराष्ट्र

maharashtra

Pune Corona Update : चिंता वाढली! पुण्यात आज 524 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 79 रुग्णांना डिस्चार्ज

By

Published : Jan 2, 2022, 9:14 PM IST

Updated : Jan 2, 2022, 10:21 PM IST

पुण्यात दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांमध्ये ( Pune Corona Patient Numbers Increased ) वाढ होताना दिसत आहे. एकीकडे राज्यात ओमायक्रॉनचे वाढत ( Omicron In Maharashtra ) असलेले रुग्ण, तर दुसरीकडे कोरोनाचे वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे पुन्हा चिंतेच वातावरण निर्माण झाला आहे. पुणे शहरात आज 524 कोरोना ( Pune Todays Corona Patient numbers ) पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

Pune Corona Update
Pune Corona Update

पुणे - नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कोरोनाने पुन्हा एकदा धुमाकूळ ( Pune Corona Patient Numbers Increased ) घालायला सुरवात केली आहे. चिंता वाढवणारी बाब म्हणजे पुण्यात ओमायक्रॉन व्हेरियंटचा ( Omicron In Maharashtra ) उद्रेक झाला आहे. मुंबई पाठोपाठ पुण्यातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. पुण्यात आज दिवसभरात 524 नवे कोरोना रुग्ण ( Pune Todays Corona Patient numbers ) आढळले असून यात ओमायक्रॉन व्हेरियंटची ( Pune Omicron Patient Numbers ) लागण झालेले 36 रुग्ण आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे.

आजची कोरोना आकडेवारी

शहरात दिवसंदिवस वाढत आहे रुग्णसंख्या -

शहरात गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाचे रुग्ण कमी झाले होते. दरोरोज 100च्या पटीत रुग्ण आढळून येत होते. मात्र, वाढत जाणारी गर्दी, नागरिकांकडून होणार नियमांचे उल्लंघन यामुळे शहरात आत्ता रुग्णसंख्या वाढायला लागली आहे. गेल्या 2 ते 3 दिवसांपासून हा आकडा वाढला असून शहरात 400 आणि 500 रुग्ण आढळून येत आहेत. एकीकडे राज्यात ओमायक्रॉनचा धोका तर दुसरीकडे दिवसंदिवस वाढत जाणाऱ्या रुग्णसंख्येमुळे चिंतेच वातावरण निर्माण झाला आहे.

शहरात आज 524 पॉझिटिव्ह रुग्ण -

शहरात आज सर्वाधिक 524 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे, तर दिवसभरात 79 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलं आहे. तर पुण्यात 1 तर पुण्याबाहेरील शुन्य रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरात आत्ता सक्रीय रुग्णसंख्या 2514 इतकी झाली असून 99 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहे.

हेही वाचा - Uday Samant On University Reform Bill : राज्यपालांच्या सुचनेनंतरच मांडले विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयक - उदय सामंत

Last Updated : Jan 2, 2022, 10:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details