महाराष्ट्र

maharashtra

Diwali Festival 2022 : तुम्ही कधी चॉकलेटचे फटाके पाहिलेत का? मग पाहा आमचा स्पेशल रिपोर्ट

By

Published : Oct 13, 2022, 9:51 PM IST

21ऑक्टोबर पासून सर्वत्र दिवाळी सणाला ( Diwali festival ) सुरवात होणार असून दिवाळीनिमित्त बाजारपेठ सजली ( market is decorated for Diwali ) असून नागरिकांकडून विविध वस्तू खरेदसाठी गर्दी केली जात आहे. पुण्यातील 85 वर्ष जुनी असलेल्या 'मूर्तीज बेकरी'च्यावतीने गेल्या 10 ते 15 वर्षांपासून फटाक्यांचे चॉकलेट ग्राहकांना उपलब्ध करुन दिले जात आहे.

Etv Bharat
Etv Bharat

पुणे - गेली दोन वर्ष कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच सण उत्सव ( Diwali festival ) हे निर्बंध मध्ये साजरे करावे लागले यंदा मात्र निर्बंधमुक्त झाल्याने सर्वच सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे .येत्या 21ऑक्टोबर पासून सर्वत्र दिवाळी सणाला ( Diwali festival ) सुरवात होणार असून दिवाळीनिमित्त बाजारपेठ सजली ( market is decorated for Diwali ) असून नागरिकांकडून विविध वस्तू खरेदसाठी गर्दी केली जात आहे. दिवाळी म्हटलं की फटाके आलेच. दरवर्षी पर्यावरण प्रदूषणाच्या ( Environmental pollution ) दृष्टीने दिवाळीत फटाके फोडू नये असे आवाहन करण्यात येत ( Environmental pollution during Diwali ) असते. मात्र, तरी देखील नागरिक मोठ्या प्रमाणात फटाके फोडतात. एकीकडे पर्यावरणासाठी जनजागृती ( Public awareness for environment ) केली जात आहे. तर दुसरीकडे मात्र फटाके काही कमी होताना दिसून येत नाहीत. हीच बाब लक्षात घेता पुण्यातील 85 वर्ष जुनी असलेल्या 'मूर्तीज बेकरी'च्यावतीने गेल्या 10 ते 15 वर्षांपासून फटाक्यांचे चॉकलेट विकले जात आहेत.

मूर्ती बेकरीने बनवलेले दिवाळीसाठी चॉकलेट फटाके

अशी झाली सुरवात -दिवाळीत बच्चे कंपनीला फटाके हे खूप आवडतात.फटाके फोडण्यासाठी मोठ्या प्रमाणात फटाके खरेदी केले जातात.आणि यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असतो दरवर्षी फटाके फोडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जाते. पण फटाक्यांचे प्रमाण कमी होताना दिसत नाही.हीच बाब लक्षात घेत 10 ते 15 वर्षापूर्वी मुर्तिज बेकरीचे मालक विक्रम मूर्ती यांनी चॉकलेटच्या माध्यमातून फटाके तयार करायला सुरवात केली आहे. बच्चे कंपनीने दिवाळीत फटाके न फोडता या अनोख्या फटाक्यांसह पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करावी, या उद्देशाने चॉकलेटचे फटाके तयार केले जात आहेत.अस यावेळी विक्रम मूर्ती यांनी सांगितल आहे.

पुण्यातील बेकरीत मिळतात चॉकलेट फटाके

विविध चॉकलेट फटाके -सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात फटाक्यांची दुकाने सजली आहेत. फटाक्यांपासून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असते. फटाक्याने अनेक दुर्घटना घडल्या देखील आहेत. फटाक्यांवर बंदी आणून देखील फटाके फोडून पर्यावरण दूषित करण्याचे काम केले जातं आहे. पण असे असले तरी फटाके फोडणाऱ्या बच्चे कंपनीला आकर्षित करण्यासाठी बाजारात चॉकलेटचे फटाके आले आहेत. या चॉकलेटच्या फटाक्यांना मोठ्या प्रमाणात मागणी असून नागरिकांकडून गिफ्ट देण्यासाठी देखील याचा वापर केला जात आहे.मुलांना फटाके आणि चॉकलेट आवडीचे असल्याने 'फटाका चॉकलेट' ही संकल्पना बाजारात आली आहे. पुण्यातील 'मूर्तीज बेकरी'च्या माध्यमातून गेल्या पाच वर्षापासून फटाक्यांचे चॉकलेट्स बाजारात विकले जात आहेत. त्याला मागणी देखील मोठ्या प्रमाणात आहे. या चॉकलेट्स फटाक्यांमध्ये रॉकेट, भुईचक्र, लक्ष्मी बॉम्ब, बॉम्ब अशा विविध फटाक्यांचे प्रकार आहेत. तसेच विशेष म्हणजे मूर्तीस बेकरीच्यावतीने चॉकलेटचा किल्लादेखील बनवण्यात आलेला आहे. अशी माहिती यावेळी मूर्तीस बेकरीचे विक्रम मूर्ती याने दिली.

दिवाळीनिमित्त बाजारपेठ सजली

चोकलेट गिफ्ट हॅम्परला मोठ्या प्रमाणात मागणी -सध्या या चॉकलेटचे फटाके बाजारात आले आहेत. या चॉकलेट फटाक्यांमुळे कोणतेही प्रदूषण होत नाही. तसेच हे फटाके पर्यावरणपूरक आहेत. कोणताही दुष्परिणाम होत नाही. हे फटाके मुलांना आकर्षित करण्याबरोबरच उत्कृष्ट चवदार असून, ते खाऊही शकतात.तसेच यंदा विशेष म्हणजे यावर्षी चॉकलेट फटाक्यांचे गिफ्ट हॅम्पर बनविण्यात आले असून या चॉकलेटच्या गिफ्ट हॅम्परला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. हे चॉकलेट चे फटाके देशभरातून मगवले जात असून या फटाक्यांना देखील मोठी मागणी असल्याचं मूर्ती यांनी सांगितल आहे.

दिवाळीनिमित्त बाजारपेठ सजली

महागाईचा फटका -गेल्या अनेक महिन्यांपासून वाढत असलेल्या महागाईचा फटका या चॉकलेट फटाक्यांना देखील बसला असून किमतीमध्ये वाढ झाली आहे.एका गिफ्ट पॅक मागे 100 रुपये एवढी वाढ झाली आहे.

चॉकलेट फटाके

ABOUT THE AUTHOR

...view details