महाराष्ट्र

maharashtra

विनामास्क फिरणाऱ्या केकेआरच्या खेळाडूवर पुण्यात कारवाई

By

Published : May 28, 2021, 3:15 PM IST

विनामास्क फिरताना आढळल्याने आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर टीमचा खेळाडू राहुल त्रिपाठी याच्यावर पुणे पोलिसांनी कारवाई केली.

KKR player Rahul Tripathi
केकेआरच्या खेळाडूवर पुण्यात कारवाई

पुणे - विनामास्क फिरताना आढळल्याने आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर टीमचा खेळाडू राहुल त्रिपाठी याच्यावर पुणे पोलिसांनी कारवाई केली. तसेच त्याच्याकडून 500 रुपयांचा दंड वसूल केला आहे. कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खडीमशीन चौकात ही कारवाई करण्यात आली.

दंड भरलेली पावती

हेही वाचा -धोका वाढला! व्हाइट फंगसमुळे आतड्यात पडले छिद्र; जगातील पहिलीच केस

खडीमशीन चौकात कारवाई -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा येथील खडीमशीन चौकात पोलीस नाकाबंदी दरम्यान येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची तपासणी करत होते. यावेळी त्यांना एका चार चाकी गाडीत एक व्यक्ती विनामास्क असल्याचे दिसले. पोलिसांनी संबंधितावर कारवाई केली असता, हा व्यक्ती प्रसिद्ध क्रिकेटपटू राहुल त्रिपाठी असल्याचे निष्पन्न झाले. राहुल त्रिपाठी हा खडकीच्या दिशेने जात असताना त्याने मास्क घातला नसल्याचे लक्षात आले होते. त्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली.

राहुल त्रिपाठी हा कोलकत्ता नाईट रायडर संघातील एक प्रमुख फलंदाज आहे. 2020 साली कोलकाता नाईट रायडर टीमने त्याला विकत घेतले होते. तेव्हापासून तो केकेआर टीमचा प्रमुख फलंदाज बनला होता. या आधी तो पुणे रायझिंग आणि राजस्थान संघासाठी आयपीएलमध्ये खेळत होता.

हेही वाचा -सलमान खान मानहानी प्रकरणात केआरकेने दिले कोर्टाला आश्वासन

ABOUT THE AUTHOR

...view details