महाराष्ट्र

maharashtra

जगातील सर्वात उंच मोटरेबल पासवर 75 फुटी तिरंगा फडकावला, पुण्यातील गिर्यारोहक स्मिता घुगेची कामगिरी

By

Published : Aug 16, 2022, 5:43 PM IST

धनकवडीच्या गिर्यारोहक स्मिता दुर्गादास घुगे हिने १५ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी सहा वाजता जम्मू आणि काश्मीरच्या लडाख जिल्ह्यातील खरदुंगला पास Khardungla Pass in Ladakh या 17982 फूट उंचीच्या Height of 17982 Feet at Khardungla Pass जगातील सर्वात उंच मोटरेबल पासवर 75 फुटी तिरंगा 75 feet Tiranga फडकवला. ही कामगिरी बजावताना स्मिता हिने आपल्यासोबत महाराष्ट्राचे स्फूर्तीदैवत शिवरायांची मूर्ती सोबत नेली होती.

Achievements of Smita Ghuge on Khardungla Pass
पुण्यातील गिर्यारोहक स्मिता घुगेची कामगिरी

पुणे धनकवडी येथील गिर्यारोहक स्मिता घुगेने राष्ट्रकुलला शोभेल अशी कामगिरी करीत लडाखमधील खरदुंगला पास Khardungla Pass in Ladakh येथे 17982 फूट उंचीवर height of 17982 feet at Khardungla Pass ७५ फुटी तिरंगा 75 feet Tiranga फडकवून आगळा विक्रम केला. 360 एक्सप्लोररचे गिर्यारोहक आनंद बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्मिताने छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्तीसोबत घेऊन तिरांगा फडकावला इतकेच नाही तर या अतिउंच ठिकाणी भारतीय राज्य घटनेच्या प्रस्ताविकेचे वाचन केले.


शिवरायांच्या मूर्तीसह फडकवला तिरंगा धनकवडीच्या गिर्यारोहक स्मिता दुर्गादास घुगे हिने १५ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी सहा वाजता जम्मू आणि काश्मीरच्या लडाख जिल्ह्यातील खरदुंगला पास या 17982 फूट उंचीच्या जगातील सर्वात उंच मोटरेबल पासवर 75 फुटी तिरंगा फडकवला. ही कामगिरी बजावताना स्मिता हिने आपल्यासोबत महाराष्ट्राचे स्फूर्तीदैवत शिवरायांची मूर्ती सोबत नेली होती. या मूर्तीच्या साक्षीने तिने तिरंगा फडकवला, तसेच भारतीय राज्यघटनेच्या प्रस्ताविकेचे वाचन करीत खरदुंगला पास येथे अत्यंत आगळ्या पद्धतीने भारताचा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा केला.

आपले यश छत्रपतींना समर्पित केले देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त खरदुंगला पास येथे 75फुटी तिरंगा फडकवण्याची संधी मिळणे, हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण होता. अत्यंत प्रतिकूल वातावरणाला तोंड देत मी हे साध्य करू शकले. कारण शिवरायांची प्रेरणा माझ्या मनात सदैव जागृत होती. मार्गदर्शक आनंद बनसोडे व महाराष्ट्रातील तमाम जनतेचा पाठिंबा आणि माझ्या कुटुंबाची साथ मिळाल्यामुळे मी हे यश मिळवू शकले. माझे हे यश मी महाराजांना समर्पित करीत असल्याची भावना घुगे हिने व्यक्त केली आहे.

हेही वाचा Mukesh Ambani Threat Case मुकेश अंबानी यांना धमकी देणाऱ्या आरोपीला 20 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

ABOUT THE AUTHOR

...view details