महाराष्ट्र

maharashtra

भाजपचा खेळ जातल्लो! गोव्यात ममतांचा नारा.. राष्ट्रवादीच्या आमदाराने पक्ष विलीन करत केला तृणमूलमध्ये प्रवेश

By

Published : Dec 14, 2021, 11:19 AM IST

गोव्यातील राष्ट्रवादीचे आमदार चर्चिल आलेमाव (NCP MLA From Goa Churchill Alemao) यांनी राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विसर्जित (NCP Dissolved In Goa) करुन तृणमूल काँग्रेस (TMC)पक्षात प्रवेश केला. एका जाहीर सभेत आलेमाव यांनी आपली मुलगी वालांका हिच्यासह ममता बॅनर्जी (TMC President Mamata Banerjee) यांच्या उपस्थितीत तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. या सभेला संबोधित करताना ममता बॅनर्जी यांनी 2022 च्या निवडणुकीत ‘भाजपचा खेळ जातल्लो’ असा नारा लगावला.

भाजपचा खेळ जातल्लो! गोव्यात ममतांचा नारा
भाजपचा खेळ जातल्लो! गोव्यात ममतांचा नारा

पणजी-एका मोठ्या राजकीय घडामोडीमध्ये, गोवा तृणमूल काँग्रेसला बाणावली येथे एका भव्य कार्यक्रमात चर्चिल आलेमाव (Churchill Alemao), त्यांची कन्या वालंका आलेमाव (Valanka Alemao) आणि इतर 38 जणांच्या समावेशासह पहिला विद्यमान आमदार (TMC Got First MLA In Goa) मिळाला. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी, तृणमूलचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी (Abhishek Banerjee), लोकसभा खासदार आणि तृणमूलचे गोवा प्रभारी महुआ मोइत्रा (Trinamool Goa in-charge Mahua Moitra), राज्यसभा खासदार आणि तृणमूलचे राष्ट्रीय उपाध्यक्ष लुइझिन फालेरो (TMC National VP Luisin Falero) यांच्या उपस्थितीत हा समावेश झाला. राज्यसभा सदस्य डेरेक ओब्रायन (Rajya Sabha member Derek O'Brien), किरण कांदोलकर (Kiran Kandolkar) आणि गोव्यातील तृणमूलचे (TMC Goa) अनेक नेते हजर होते.

भाजपचा खेळ जातल्लो! गोव्यात ममतांचा नारा..

चर्चिल आलेमाओ हे गोवा विधानसभेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) एकमेव आमदार होते. सोमवारी सकाळी त्यांनी राष्ट्रवादीचा तृणमूलमध्ये विलीन होण्याचा ठराव सभापती राजेश पाटणेकर (Speaker Rajesh Patnekar) यांच्याकडे सुपूर्द केला. काही तासांनंतर बाणावलीमध्ये एक मोठी रॅली आयोजित करण्यात आली. जिथे चर्चिल आलेमाव म्हणाले, 'या ग्रहावर जर कोणी भारताचा पंतप्रधान होऊ शकतो, तर त्या ममता दीदी आहेत. त्या पंतप्रधान झाल्या तर भाजपला बाहेर फेकून देतील.

भाजपचा खेळ जातल्लो! गोव्यात ममतांचा नारा

ममता बॅनर्जी म्हणाल्या, 'प्रत्येकाला भाजपमध्ये जावेसे वाटते. त्यांनी शून्य कारभार आणि शून्य कामगिरी दाखवली. ते लोकशाही आणि वारसा मारण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजप हा फेकुंचा पक्ष आहे. जर कोणताही पक्ष आमच्यासोबत युती करण्यास तयार असेल, तर त्यांचे स्वागत आहे, पण यावेळी आम्ही भाजपला जिंकू देणार नाही.

अभिषेक बॅनर्जी म्हणाले, 'हे तीन अक्षरे विरुद्ध तीन अक्षरे आहेत. हे B-J-P विरुद्ध G-O-A आहे. तृणमूल कधीही कोणत्याही निहित स्वार्थासाठी तुमच्या भावनांची देवाणघेवाण करणार नाही. 2017 मध्ये भाजपने मागील दाराने प्रवेश घेतला. पण ,आपल्याला आता 2022 मध्ये त्यांना समोरच्या दारातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवावा लागेल. ते जसे इतर पक्षांना घाबरवते तसे ते तृणमूललाही धमकावले जाते. पण काहीही झाले तरी तृणमूल कधीही भाजपला आपला आत्मा विकणार नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details