महाराष्ट्र

maharashtra

कोकण रेल्वेवरील करमली बोगद्यात दरड कोसळली, रेल्वे वाहतूक ठप्प

By

Published : Jul 19, 2021, 5:44 PM IST

मुसळधार पावसाचा फटका आज कोकण रेल्वेला बसला आहे. आज पहाटे करमली बोगद्यात भगदाड पडून मातीचा भराव रेल्वे ट्रॅकवर कोसळला. यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक विस्कळीत झाली होती

railway track
railway track

पणजी - मुसळधार पावसाचा फटका आज कोकण रेल्वेला बसला आहे. आज पहाटे करमली बोगद्यात भगदाड पडून मातीचा भराव रेल्वे ट्रॅकवर कोसळला. यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक विस्कळीत झाली होती. मुसळधार पावसामुळे बोगद्याच्या मध्यभागी तडा जाऊन माती कोसळल्यामुळे ट्रॅकवर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. कोकण रेल्वेकडून मातीचा भराव काढण्याचे काम युद्धपातळींवर सुरू आहे. मात्र, मुसळधार पावसामुळे वेळोवेळी कामात अडथळा येत आहे.

येत्या 3 ते 4 तासात परिस्थितीचा अंदाज घेऊन वाहतूक पूर्ववत करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे कोकण रेल्वेचे इंजिनिअर बी. वी. निकम यांनी सांगितले आहे.

मडगाव आणि थिविम स्टेशन दरम्यान प्रवाशांच्या सुविधेसाठी बसची सोय -

बोगद्यात दरड कोसळल्यामुळे सर्व रेल्वे गाड्या थिविम व मडगाव स्थानकात उभ्या करण्यात आल्या आहेत. दोन्ही स्थानकात अडकलेल्या प्रवाशांच्या वाहतुकीसाठी बसची सोय करण्यात आली आहे.

कामात पावसाचा अडथळा -

कोकण रेल्वेकडून बोगद्यातील मातीचा भराव हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे, मात्र या कामात मुसळधार पावसाचा व्यत्यय येत आहे.

पावसाचा अंदाज घेऊन वाहतूक पूर्ववत होणार- बी वि निकम

कामात पावसाचा व्यत्यय होत आहे. मात्र, कोकण रेल्वे प्रशासन वाहतूक पूर्ववत करण्याचा प्रयत्न करत असून येत्या 3 ते 4 तासात परिस्थितीचा अंदाज घेऊन वाहतूक पूर्ववत करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे कोकण रेल्वेचे इंजिनिअर बी वी निकम यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details