महाराष्ट्र

maharashtra

गोवा सरकार आणि आचरेकर अकादमीत समझोता करार

By

Published : Nov 2, 2021, 10:42 PM IST

राज्यात क्रिकेट क्षेत्रात उत्तम खेळाडू घडविण्यासाठी राज्य सरकारने आचरेकर क्रिकेट अकादमीसोबत समझोता करार केला आहे. या अकादमीच्या माध्यमातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर गोव्यातून खेळाडू घडविण्याचे काम करणार असल्याचे रणजीपटू प्रवीण आमरे यांनी सांगितले.

Pramod sawant
गोवा सरकार आणि आचरेकर अकादमीत समझोता करार

पणजी - राज्यात क्रिकेटमधील खेळाडूंना उत्तम प्रशिक्षण प्राप्त होण्यासाठी सरकारने आचरेकर क्रिकेट अकादमी आणि राज्य सरकार यांच्यात समझोता करार केला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला. यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत, आचरेकर अकादमीचे प्रमुख रणजीपटू प्रवीण आमरे उपस्थित होते. या अकादमीच्या माध्यमातून दक्षिण गोव्यातील न्हवेली क्रिकेट स्टेडियमवर खेळाडूंना क्रिकेटचे धडे देण्यात येणार आहे.

गोवा सरकार आणि आचरेकर अकादमीत समझोता करार
क्रिकेट अकादमीत खेळाडूंना मोफत प्रशिक्षण - मुख्यमंत्रीआचरेकर अकादमीच्या माध्यमातून राज्यातील नवोदित खेळाडूंना मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. राज्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडू निर्माण करण्यासाठी पुढची 10 वर्षे याच अकादमीच्या माध्यमातून रणजीपटू प्रवीण आमरे आणि त्यांचे सहकारी खेळाडूंना प्रशिक्षण देणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे.
रणजीपटू प्रवीण आमरे घडवणार क्रिकेटपटू
गोव्यातून राष्ट्रीय खेळाडू घडविणार - प्रवीण आमरेराज्यात क्रिकेट क्षेत्रात प्रगती करण्यासाठी,तसेच या खेळाला उभारी देण्यासाठी तळागाळातील मुलांना प्रशिक्षण देण्यासाठी या अकादमीची गोव्यात स्थापना करण्यात आल्याचे रणजीपटू प्रवीण आमरे यांनी सांगितले.हेही वाचा -केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांचा आदिवासी भगिनींसोबत तारपा नृत्य

ABOUT THE AUTHOR

...view details