महाराष्ट्र

maharashtra

पैशांच्या पावसाचे आमिष दाखवणाऱ्या बलात्कारी बाबाला भिवंडीत अटक

By

Published : Aug 16, 2019, 5:52 PM IST

भोंदू विनोदबाबा उर्फ तुकाराम हिरे विरोधात गंगापूर पोलिसात एका महिलेला पैशाच्या पावसाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याची तक्रार दाखल झाली होती. त्यासंदर्भात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

नाशिक पोलीस

नाशिक- पैशांच्या पावसाचे आमिष दाखवून बलात्कार करणाऱ्या भोंदूबाबासह त्याच्या साथीदाराला नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. श्रीमंती मिळवून देण्यासाठी बनावट लग्न करून बलात्कार केल्या प्रकरणी गांगपूर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. ही घटना गंभीर असल्याने पोलिसांनी तपासाला गती देत मुख्य संशयिताला भिवंडीतून अटक केली.

नाशिकच्या भोंदूबाबाला भिवंडीत अटक
भोंदू विनोदबाबा उर्फ तुकाराम हिरे विरोधात गंगापूर पोलिसात एका महिलेला पैशाच्या पावसाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याची तक्रार दाखल झाली होती. त्यासंदर्भात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. झटपट श्रीमंती मिळवून देण्यासाठी पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून भोंदू विनोदबाबासह त्याच्या काही साथीदारांनी फसवणूक केली. विनोदबाबा याने बनावट पद्धतीने लग्न केल्याचे एक पूजा करून भासविले. त्यानंतर पीडितेसोबत बळजबरीने शरीरसंबंध ठेवून बलात्कार केला असल्याची माहिती पीडितेने पोलीसांना दिली होती.
या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात संशयितांविरोधात बलात्कारासह मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आधी भोंदू बाबाचे सहकारी राजेंद्र गायकवाड आणि अशोक पवार यांना ओझर येथून तर भोंदू बाबाला भिवंडी येथून अटक केली. या प्रकरणात एका महिलेचाही समावेश असल्याची माहिती समोर आली असून संशयित महिला फरार आहे. दरम्यान अशा कुठल्याही आमिषाला बळी पडू नका असे आवाहन नाशिक पोलिसांनी केले आहे.
Intro: पैशांच्या पावसाचे आमीष दाखवत बलात्कार करणाऱ्या भोंदू बाबा संह त्याच्या साथीदाराला नाशिक पोलिसांनी बेड्या ठोकल्याय. पीडित महिलेला झटपट श्रीमंती मिळवून देण्यासाठी बनावट लग्न करत पुजा करत बलात्कार केल्या प्रकरणी गांगपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी घटना गंभीर असल्याने तपासाची चक्र फिरवत मुख्य संशयिताच्या भिवंडीत शहरात अटक केलीय..Body:भोंदू विनोदबाबा उर्फ तुकाराम हिरे.. गंगापुर पोलिसांत याच्या विरोधात एका पीडित महिलेने पैशाच्या पावसाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची तक्रार दिली होती.. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय.. पीडितेला झटपट श्रीमंती मिळवून देण्यासाठी पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखविले.. भोंदू विनोदबाबासह त्याच्या काही साथीदारांनी दाखविल्याची फिर्याद पीडितेने म्हंटलंय... विनोदबाबा याने पीडितेबरोबर बनावट पद्धतीने लग्न केल्याचे एक पूजा करून भासविले.. आणि त्यानंतर पीडितेसोबत बळजबरीने शरीरसंबंध ठेवून बलात्कार केला असल्याची माहिती पीडितेने पोलिसांना दिलीय.. प्रकरण गंभीर असल्याने गंगापूर पोलीस ठाण्यात संशयितांविरोधात बलात्कारासह मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.. पोलिसांनी सुरूवातीला भोंदू बाबाचा साथीदार राजेंद्र गायकवाड आणि अशोक पवार यांना ओझर येथून अटक केली त्यानंतर तपासाला गती देत भिवंडीत लपलेल्या भोंदू बाबाच्या मुसक्या आवळल्याय.

बाइट ०१ - अमोल तांबे - पोलिस उपायुक्त, नाशिक Conclusion:दरम्यान या प्रकरणात एका महिलेचा समावेश असल्याची माहिती समोर आली असून संशयित महिला फरार आहे. पोलिस तिच्या मागावर असले तरी अश्या कुठलाही आमिषाला बळी पडू नका असे आवाहन नाशिक पोलिसांनी केलय. झटपट श्रीमती मिळवण्याच्या नादात कुणाला बळी पडू नका अशी वेळ वारंवार सांगण्याची वेळ पोलिसांना वारंवार येते. त्यामुळे अशी कुठल्याही आमिषाला बळी पडू नका..

टिप:-.. ( सफेद शर्ट घातलेला आहे ) भोंदू विनोदबाबा उर्फ तुकाराम हिरे.

ABOUT THE AUTHOR

...view details