महाराष्ट्र

maharashtra

नाशिकमधील 9 जणांना राष्ट्रपती पोलीस पदक

By

Published : Aug 15, 2020, 10:40 AM IST

नॅशनल इंटरनॅशनल सेंटरमध्ये डॉ. सिताराम कोल्हेंचे 14 रिसर्च पेपर्स प्रकाशित झाले असून गुन्हेगारांना मूळ प्रवाहामध्ये आणण्यासह गुन्हे उघडकीस आणले आहेत. तसेच कोरोना काळात नाशिक शहर पोलीस दलाच्या नोडल अधिकारी पदाची उत्कृष्टपणे जबाबदारी सांभाळली.

nine police got rashtrapati award in nashik
nine police got rashtrapati award in nashik

नाशिक - केंद्रीय गृहमंत्रालयातर्फे पोलीस दलातील शौर्य, उल्लेखनीय कामगिरी तसेच प्रशासनीय सेवा बजावणाऱ्यांना या पदकाने सन्मानित केले जाते. डॉ. सिताराम कोल्हें यांची 1992 मध्ये उपनिरीक्षकपदी नियुक्ती झाली. 28 वर्षाच्या कारकिर्दीत त्यांना 609 पेक्षा अधिक अवॉर्ड मिळाले आहेत. नॅशनल इंटरनॅशनल सेंटरमध्ये डॉ. सिताराम कोल्हेंचे 14 रिसर्च पेपर्स प्रकाशित झाले असून गुन्हेगारांना मूळ प्रवाहामध्ये आणण्यासह गुन्हे उघडकीस आणले आहेत. तसेच कोरोना काळात नाशिक शहर पोलीस दलाच्या नोडल अधिकारी पदाची उत्कृष्टपणे जबाबदारी सांभाळली.

यासोबतच विजय लोंढे 1985 मध्ये पोलीस दलात भरती झाले. पोलीस उपनिरीक्षक पदाची खाते अंतर्गत परीक्षा दिली. ते आता गुन्हे शाखेत कार्यरत असून मुथुट फायनान्स दरोडा प्रकरणाच्या तपासामध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली. रणमाळे 1983 पासून पोलीस दलात आहेत. 2013 मध्ये खात्यांतर्गत परीक्षा देऊन त्यांना उपनिरीक्षक पदी बढती मिळवली. ते स्थानिक गुन्हे शाखा मनमाड पोलीस ठाणे येथे कर्तव्य बजावत असताना त्यांनी विविध गुन्ह्यांचा तपास केला. या काळात त्यांना 482 अवार्ड मिळाले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सांगळे, मंसुरी, वेताळ, बाविस्कर चंद्रात्रे यांनी गडचिरोलीच्या नक्षलग्रस्त भागातदेखील खडतर सेवा बजावली असून यांना पोलीस दलातील उल्लेखनीय कामगिरीसाठी राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details