महाराष्ट्र

maharashtra

Navratri 2022 : नवरात्रीत करा कन्यापूजन,जाणुन घ्या कन्या पूजनचे काय आहे महत्व

By

Published : Oct 1, 2022, 6:40 PM IST

Updated : Oct 3, 2022, 9:21 AM IST

नवरात्रीत 'कन्यापूजन' म्हणजेच 'कुमारिका पूजनला' विशेष महत्व आहे. जाणुन घेऊया कन्या Navratri importance of Kanya Pujan पूजनचे महत्व.

Navratri 2022
कन्या पूजनचे काय आहे महत्व

नवरात्रीत कन्या पूजन केल्याने दुर्गा माता प्रसन्न होते, घरातील दारिद्रय दूर होते, कुटुंबात सुख-समृद्धी नांदते, घरात कल्याण होते, आरोग्य चांगले राहते, विजय प्राप्त होते, शत्रूंचा नाश होतो अशी संकल्पणा आहे. म्हणून अनेक ठिकाणी महिला कन्यापूजन Navratri importance of Kanya Pujan करून त्यांचे आशीर्वाद घेतात.



कुमारिका पूजन : नवरात्रीत शक्तीची उपासना केली जाते. देवी आईची उपासना केल्याशिवाय शक्ती येत नसते. जगात स्त्री ही देवीचा अंश आहे, अशी मान्यता आहे. म्हणून नवरात्रीत 2 ते 10 वर्षांपर्यंत वयाच्या मुलींची पुजा करण्याची परंपरा आहे. या मुलींना साक्षात देवीचे रूप मानले जाते, यांना 'कुमारिका' असे म्हणतात. कुमारिकांच्या पायांचे पूजन करून त्यांना जेवण आणि भेटवस्तू देण्याची प्रथा चालत आली असून; याला धर्मीक महत्व आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करतांना पूजारी



कसे करावे कन्या पूजन :2 ते 10 वर्षांच्या मुलींचे कन्या पूजन करावे. कुमारिकांना पाय धुऊन आसनावर बसवावे. त्याच्या कपाळावर हळदी, कुंकू लावावे. त्यानंतर त्यांना जेवण आणि भेटवस्तू द्यावी. शेवटी त्यांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घ्यावे.



काय लाभ होतो : कुमारिकांना साक्षात देवीचे रूप मानले जाते आणि त्यांचं पूजन केल्याने दुर्गा माता प्रसन्न होते. घरातील दारिद्रय दूर होते, राजयोग प्राप्त होतो, कुटुंबात सुख-समृद्धी नांदते, घराचं कल्याण होते, आरोग्य चांगले राहते, विजय प्राप्त होते आणि शत्रूंचा नाश होतो असा भाविकांचा समज आहे.



अष्टमीला कन्यापूजन चे महत्व :नवरात्र उत्सवातील आठव्या माळीला 'अष्टमी' असे म्हणतात. या दिवशी कन्या पूजन करणे शुभ मानले जाते. या दिवशी गौरीमातेचे पूजन केले जाते. नवरात्रात पहिल्या दिवसापासून ते अष्टमीपर्यंत कन्या पूजन केले जाते. मात्र, अष्टमीला कन्या पूजेला विशेष महत्त्व आहे. या दिवशी 2 ते 10 वर्षांच्या मुलींचे कन्यापूजन केले जाते.

Last Updated : Oct 3, 2022, 9:21 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details