महाराष्ट्र

maharashtra

लोकांना फसवणाऱ्या ज्योतिषाचा अंनिस'कडून भांडाफोड, पोलिसांनी घेतले ताब्यात

By

Published : Sep 8, 2021, 3:39 AM IST

Updated : Sep 8, 2021, 12:07 PM IST

लाेकांच्या समस्या साेडवण्याच्या नावाखाली त्यांना गंडवणाऱ्या हायप्राेफाेईल ज्याेतिषाचा अंधश्रद्धा निर्मूलन समिती व आम आदमी पार्टिने भांडाफोड केला आहे. गंगापूर राेड येथे हा प्रकार समोर आला असून, पाेलिसांनी गणेश महाराज नावाच्या या ज्याेतिषी भामट्याला अटक केली आहे.

भोंदूला पोलिसांनी घेतले ताब्यात
भोंदूला पोलिसांनी घेतले ताब्यात

नाशिक - ज्याेतिष, कलश पू्जेच्या नावाने लाेकांच्या समस्या साेडवण्याच्या नावाखाली त्यांना गंडवणाऱ्या हायप्राेफाेईल ज्याेतिषाचा अंधश्रद्धा निर्मूलन समिती व आम आदमी पार्टिने भांडाफोड केला आहे. गंगापूर राेड येथे हा प्रकार समोर आला असून, पाेलिसांनी गणेश महाराज नावाच्या या ज्याेतिषी भामट्याला अटक केली आहे.

माहिती देताना अंनिसचे कार्यकर्त्या आणि पदाधिकारी

'बाबाने महिलेला मुलबाळ होईल असे आश्वासन देत ५० हजार रुपये मागितले'

गंगापूर रोडवरील जेहान सर्कलवरील अतुल डेअरीमागे असलेल्या सुमंगल अपार्टंमेंटमध्ये संशयीत गणेश महाराज हा स्वतःला ज्योतिषी म्हणवून घेत होता. अनेक नागरिकांना त्याने गंडवले आहे. अशी माहिती अंनिसला मिळाली होती. दरम्यान, पोलिसांच्या मदतीने अंनिसने एक बनावट जोडपे या भोंदूकडे पाठवले. या महिलेने भोंदूबाबाकडे जाऊन मुलबाळ होत नसल्याचे सांगितले. दरम्यान, या बाबाने महिलेला मुलबाळ होईल असे आश्वासन देत ५० हजार रुपये मागितले. तसेच, महिलेशी अश्लील वर्तन केले असल्याचे महिले सांगितले आहे.

'बाबाने महिलेला येताना काळी साडी घालून ये, दोन लिंबू घेऊन सांगितले होते'

अंनिसच्या पदाधिकाऱ्यांनी या भोंदूबाबाचा पर्दाफाश केला असून, त्याच्याविरोधात नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाण्यात विनयभंगसह जादूटोणाविरोधी कायद्याद्वारे गुन्हा नोंदवीण्याची प्रक्रिया सुरु होती. हा भोंदू बाबा हा मुळचा जळगावातील जामनेरचा आहे. जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या घरासमोर त्यांचा बंगला आहे. बाबाची एक हाय प्रोफाईल टोळी असून, महागडी वाहने वापरणे, विमानाने प्रवास करणे, हे त्याचे शोक आहेत. तसेच, उच्चभ्रू लोकांसाठी इंग्रजी वृत्तपत्रात जाहीराती देऊन फसवल्याचे समोर आले आहे. तसेच, ताे देशभर हे फिरुन आल्याचेही समाेर येत आहे.

'सहायक पोलीस निरीक्षक नितीन पवार हे तपास करत आहेत'

हा बाबा नाव व मोबाईल नंबर बदलून फसवणूक करण्याचे काम करतो अशी माहिती अंनिसचे कृष्णा चांदगुडे यांनी दिली आहे. बाबाने या महिलेला उद्या येताना काळी साडी घालून ये, दोन लिंबू घेऊन ये, आजच दही खा, उद्यापासून दही खाता येणार नाही, तसेच माझी ५० हजार रुपये फी घेऊन ये, असे सांगितले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक नितीन पवार हे तपास करत आहेत. अंनिसकडून राज्यसरचिटणीस डॉ. टी.आर.गोराणे, राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे, जिल्हा प्रधान सचिव अॅड. समीर शिंदे, आम आदमी पार्टीचे जितेंद्र भावे उपस्थित हाेते.

Last Updated :Sep 8, 2021, 12:07 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details