महाराष्ट्र

maharashtra

IND vs AUS : दुसऱ्या टी-20 सामन्यात आमचाच विजय; दोन्ही संघांनी केला दावा

By

Published : Sep 23, 2022, 12:55 PM IST

Suryakumar Yadav
सुर्यकुमार यादव

आज नागपुरात पावसाची संततधार असल्याने आज भारत आणि ऑस्ट्रेलियाचा संघ ( Team India and Australia ) सराव करू शकले नाही. मात्र दोन्ही संघांनी विजयाचा दावा ( Both teams claimed Our victory in the second T-Twenty match ) केला आहे. ( IND vs AUS T20 Series )

नागपूर :आज नागपुरात पावसाची संततधार असल्याने आज भारत आणि ऑस्ट्रेलियाचा संघ ( Team India and Australia ) सराव करू शकले नाही. मात्र दोन्ही संघांनी विजयाचा दावा केला आहे. पहिल्या टी-20 क्रिकेट सामन्यात ( T-Twenty matches ) भारताचा पराभव झाल्याने उद्याचा सामना जिंकणे आवश्यक आहे, तर सलग दुसरा विजय मिळवून मालिका खिशात घालण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ मैदानात उतरणार आहे. ( second T Twenty matches )


भारतीय खेळपट्ट्यांची चांगली जाण-टीम डेव्हिड : पहिल्या टी-20 सामन्यात ( IND vs AUS T20 Series ) पदार्पण करणाऱ्या ऑस्ट्रेलियन खेळाडू टीम डेव्हिडने नागपूरच्या सामन्यात चमकदार कामगिरीची आशा व्यक्त केली आहे. आज टीम डेव्हिडची ऑनलाइन पत्रकार परिषद संपन्न झाली त्यामध्ये तो बोलत होता. तो म्हणाला की भारतीय परिस्थितीत खेळण्याचा त्याच्याकडे खूप अनुभव आहे. त्यामुळे त्याला भारतीय खेळपट्ट्यांची चांगली जाण असल्याने अधिक धावा करण्यास मदत मिळेल. टीम डेव्हिड आक्रमक बॅटिंगसाठी ओळखला जातो. आणि मागच्या सामन्यात डेव्हिडने 128 च्या स्ट्राईक रेटने 18 धावांची इनिंग खेळली.


रोहितच्या त्या कृतीचे समर्थन : सुर्यकुमार यादव :मोहाली येथे खेळण्यात आलेल्या पहिल्या टी- २० सामन्यात भारताच्या पराभवापेक्षा कर्णधार रोहित शर्माच्या (Captain Rohit Sharma) आक्रमक वृत्तीची अधिक चर्चा होत आहे. वास्तविक,सामन्यादरम्यान रोहित खूप आक्रमक होता. दरम्यान, त्याने दिनेश कार्तिकचे डोकेही धरलेले दिसले. त्यानंतर त्यांच्यावर बरीच टीका झाली. यावर सूर्यकुमार यादवने रोहित शर्माचा बचाव करताना सांगितले की, मैदानावर खूप दडपण असतं. रोहित शर्माने वातावरण निवळण्यासाठी हे सर्व केले आहे. याशिवाय जसप्रीत बुमराह आता पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे सूर्यकुमार म्हणाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details