नागपूर -जिल्ह्यात कोरोनाच्या ओमायक्रॉन या व्हेरीएंटच्या ( Nagpur Municipal Corporation Precaution for Omicron ) पार्श्वभूमीवर उपाययोजना राबवायला सुरवात करण्यात आली आहे. जिल्ह्यात सध्याच्या घडीला मोजकेच रुग्ण ( Nagpur Corona Patient ) असल्याने आमदार निवासाच्या इमारत ( MLA Hostel Covid Center ) क्रमांक दोनमध्ये कोविड सेंटर तयार करण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील इतर कोविड सेंटर सध्या कार्यरत नसले, तरी रुग्ण वाढल्यास हे सेंटर तयार असल्याचे सांगण्यात येत आहे.
सद्यस्थितीत नागपुरात 321 रुग्ण कोरोना -
जिल्ह्यात दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. दररोज सहा ते सात हजार जणांना कोरोनाची बाधा असल्याचे समोर येत होते. त्यामुळे शहरातील सर्वच भागत कोविड सेंटर उभारण्यात आले होते. सध्याच्या घडीला नागपूर जिल्ह्यात 321 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहेत. यातील बरेच रुग्ण हे खासगी रुग्णालयात उपाचर घेत आहेत. तेच 40 ते 50 रुग्ण हे आमदार निवासात तयार करण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहेत. या ठिकाणी डॉक्टरांची चम्मू असून जर रुग्णांना गरज पडल्यास तत्काळ उपचाराची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यासोबत गरज पडल्यास रुग्णांना हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी रुग्णवाहिका सुद्धा उपलब्ध आहे.
रुग्णसंख्या वाढल्यास इतर कोविड सेंटर पुन्हा सुरू -
नागपूर जिल्ह्यात ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर संशयित रुग्ण आढळून आल्यास त्यांना याच आमदार निवसातील कोविड सेंटरमध्ये ठेवण्यात येत आहे. तर ओमायक्रॉनची बाधा झालेल्या सहा रुग्णांना मिहानमधील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात येत होते. यासोबत बाहेर देशातून विमानाने आलेल्या रुग्णांना संशयित असल्यास याठिकाणी ठेवण्यात येत आहे. प्राथमिक स्तरावर 400 बेड हे ओमायक्रॉन रुग्णासाठी तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे. रुग्णसंख्या वाढल्यास इतर कोविड सेंटर पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.