महाराष्ट्र

maharashtra

Omicron Test : ' ओमायक्रॉनचा संसर्ग झालाय हे ओळखण्यासाठी ही टेस्ट करा

By

Published : Dec 29, 2021, 11:00 AM IST

ओमायक्रॉन
SGTF strategy will help in early detection of Omicron cases

कोरोनाच्या कोणत्या व्हेरिएंटची लागण झाली आहे, हे शोधण्यासाठी जिनोम सिक्वेसिंग ही उत्तम पद्धत असली तरी ती अधिकवेळ घेणारी आणि खर्चिक पद्धत आहे. यासाठी आरटीपीसीआर चाचणीतून ​S -Gene टार्गेट तपासलं ( SGTF Strategy to Detection of Omicron ) जात आहे. टेस्ट करताना​ S -Gene टार्गेट आढळले नाही तर आपल्याला ओमायक्रॉन नाही, असे समजलं जातं.

नागपूर - कोरोना विषाणूचे नवीन व्हेरिएंट येत आहे. यात सध्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने खळबळ माजवली आहे. कोरोनाच्या कोणत्या व्हेरिएंट लागण झाली आहे, हे शोधण्यासाठी जिनोम सिक्वेसिंग ही उत्तम पद्धत असली तरी ती अधिकवेळ घेणारी आणि खर्चिक पद्धत आहे. पण एकदा आरटीपीसीआर पॉझिटिव्ह आल्यानंतर पुन्हा आरटीपीसीआर टेस्ट ज्यामध्ये S -Gene टार्गेट फेलियर असल्याचे ( SGTF Strategy to Detection of Omicron ) कळते. त्या टेस्टमध्ये आरटीपीसीआर स्तरावर ओमायक्रॉन नामक व्हेरिएंटची बाधा झाल्याची ओळख पटत आहे. पण असे असले तरी ओमायक्रॉन बाधितला शिक्कामोर्तब करण्यासाठी जिनोम सिक्वेन्सिंग करणेही अधिक गरजेचे असल्याचे विषाणू शास्त्रज्ञ डॉ. कृष्णा खैरणार यांनी ईटीव्ही भारतशी बोलतांना सांगितले.

​S -Gene टार्गेट फेलियर नेमकं आहे तरी काय ?

​S -Gene टार्गेट फेलियर नेमकं आहे तरी काय ?

S-GENE ड्रॉप डिटेक्शन किटचा वापर ओमायक्रॉन आहे की नाही हे शोधण्यासाठी करण्यात यावा, असे निर्देश महाराष्ट्र सरकारने दिले आहेत. कोविड-19 च्या ओमायक्रॉन प्रकारात S जीन अस्तित्वातच नाहीये. याचाच अर्थ जर टेस्ट करताना S जीन आढळला नाही तर आपल्याला ओमायक्रॉन नाही.

व्हेरिएंटची ओळख पटवणे गरजेचे -


महाराष्ट्रातही गेल्या काही दिवसांमध्ये ओमायक्रॉनची बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. पण सोबतच डेल्टा या व्हेरियंटचेही बाधित रुग्णही आढळत आहेत. त्यामुळे नव्याने मिळणारे रुग्ण हे कोव्हीड पॉझिटिव्ह असले तरी झपाटयाने वाढणाऱ्या ओमायक्रॉनचे तर नाही ना? याची ओळख पटवणे गरजेचे झाले आहे.

या टेस्टमुळे अर्ली डिटेक्शन होते सोपे -


कोरोनाची बाधा झाली आहे हे आरटीपीसीआर चाचणीतुन कळते. पण कोणत्या व्हेरिएंटची बाधा आहे हे मात्र कळत नाही. त्यामुळे व्होल जिनोम सिक्वेन्सिंग करून त्याचा खुलासा किंवा शिक्कामोर्तब केले जाऊ शकतो. आरटीपीसीआर टेस्टमध्ये S -Gene टार्गेट फेलियर सांगणारी टेस्ट असल्यास तो रुग्ण ओमायक्रॉनचा आहे का नाही हे सागितलं जाऊ शकतो. ही टेस्ट किट केवळ एकच कंपनी सध्या बाजारात बनवत आहे. कोरोनाच्या व्हेरीयंटमधील प्रोटिन स्पाईकमध्ये म्युटेशन होऊन बदल झालेत. या किटच्या टेस्टमध्ये ​S -Gene टार्गेट फेलियर दिसते. त्यामुळे त्याला ओमायक्रॉन बाधित रुग्ण म्हणून प्राथमिक स्तरावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास लागलीच फायद्याचे ठरते. पण या प्रकरणांतही व्होल जिनोम सिक्वेन्सिंग करण्याचा सल्ला विषाणू तज्ज्ञांकडून दिला जातो. कारण त्यामुळेच त्या विषाणूला ओमायक्रॉन हा व्हेरीयंट आहे की आणखी कुठला व्हेरीयंट आहे यावर शिकामोर्तब करण्यास अधिक सोपे जात असल्याचे सांगितले जाते.

आरटीपीसीआर टेस्ट विशेष का ठरते -


थर्मोफिशर कंपनीची या एकमेव कंपनीची टॅगपॅथ आरटीपीसीआर किट बाजारात उपलब्ध आहे. या किटची विशेषता म्हणजे यात एस- जीन, एन-जीन आणि ओआरएफ आहे का नाही हे स्पष्ट होते. यात ओमायक्रॉनचा पॉझिटिव्ह रुग्ण असल्यास म्युटेशन होऊन ओमायक्रॉन हा विषाणू बनल्याने यात तोS -Gene टार्गेट फेलियरअसल्यास तो रुग्ण ओमायक्रॉन व्हेरिएंट बाधित असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे जिनोम सिक्वेन्सिंगने अधिकृत होणारी ओळख या टेस्टमुळे अर्ली स्टेजवर होण्यास मदत होते. त्यामुळे वेळेची आणि पैश्याची बचत होते असल्याने मधला पर्याय उपलब्ध होतोे. जिनोम सिकव्हेनसिंगर शिवाय पर्याय नाहीच असेही निरीच्या व्हायरलॉजी विभाग प्रमुख डॉ. कृष्णा खैरनार यांनी सांगितले आहे.

'या' परिस्थितीत फायदेशीर ठरू शकते ही टेस्ट -


त्यामुळे ज्या ठिकाणी जिनोम सिकव्हेनसिंग करण्यासाठीची सोय उपलब्ध नाही, याठिकाणी या पद्धतीने ओमायक्रॉन कोरोना व्हेरीयंटसाठी आरटीपीसीआर स्तरावर होणारी चाचणी सोपी, कमी खर्चिक जलदगतीने उपाययोजना करण्यासाठी फायदेशीर ठरू शकते असेही सांगितले जात आहे.

हेही वाचा -Ajit Pawar Reply : राज्य कसं चालवायचं ते आम्हाला कळतं; अजित पवारांचा विरोधकांना टोला

ABOUT THE AUTHOR

...view details