महाराष्ट्र

maharashtra

Nagpur Cricket Match : क्रिकेट सामन्यावर पावसाचे सावट, पुढील काही दिवस विदर्भात पावसाचा अंदाज

By

Published : Sep 22, 2022, 1:19 PM IST

Nagpur cricket match

व्हीसीएच्या स्टेडियमवर तब्बल तीन वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेट रंगणार आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमींची उत्सुकता वाढली आहे. मात्र, हवामान विभागाने शुक्रवारी पावसाचा अंदाज वर्तवला (Rain forecast in Vidarbha for next few days) आहे. हवामान विभागाचा अंदाज खरा ठरल्यास क्रिकेट शौकिनांच्या उत्साहावर विरजण पडण्याची शक्यता (Nagpur cricket match will be rained out) आहे.

नागपूर :ऑस्ट्रेलिया सोबत सुरू असलेल्या टी-ट्वेंटी क्रिकेट मालिकेचा पहिला सामना मोहाली येथे खेळण्यात आला. मात्र, पहिल्याच सामन्यात भारतीय क्रिकेट संघाला पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यामुळे आता नागपुरात होणाऱ्या दुसऱ्या टी-ट्वेंटी क्रिकेट सामन्याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलेलं आहे.

प्रतिक्रीया देताना प्रादेशिक हवामान विभाग संचालक

नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन जामठाच्या मैदानावर भारतीय संघ पराभवाचा वचपा काढेल का ? याकडे सुद्धा क्रिकेट रसिकांच्या नजरा लागलेले आहेत. मात्र, नागपूरच्या सामन्यावर पावसाचं गहन सावट (Rain forecast in Vidarbha) असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे क्रिकेट प्रेमींच्या उत्साहावर विरजण पडण्याची शक्यता (Nagpur cricket match will be rained out) आहे.

व्हीसीएच्या स्टेडियमवर तब्बल तीन वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेट रंगणार आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमींची उत्सुकता वाढली आहे. मात्र, हवामान विभागाने शुक्रवारी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागाचा अंदाज खरा ठरल्यास क्रिकेट शौकिनांच्या उत्साहावर विरजण पडण्याची शक्यता (Rain forecast in Vidarbha for next few days) आहे.


जामठ्याची 'ड्रेनेज सिस्टीम' उत्तम -बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे विदर्भात २१ सप्टेंबर ते २३ दरम्यान पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. जमठा स्टेडियमची 'ड्रेनेज सिस्टीम' उत्तम आहे. त्यामुळे थोडाफार पाऊस आल्यास फार फरक पडणार नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details