महाराष्ट्र

maharashtra

Former Energy Minister Nitin Raut Letter राज्यात सत्तांतर होणार याची कल्पना काँग्रेस नेते नितीन राऊतांना होती का हा प्रश्न

By

Published : Sep 1, 2022, 1:43 PM IST

उद्धव ठाकरे यांचे सरकार जाऊन शिंदे-फडणवीस यांचे सरकार सत्तेवर Uddhav Thackeray Government Collaps आले आहे. परंतु, माजी ऊर्जामंत्री नितीन राऊत Former Energy Minister Nitin Raut Know Exactly यांना उद्धव ठाकरे यांचे सरकार नेमके कधी कोसळणार हे आधीच माहिती होते का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिवांना लिहिलेल्या एका पत्रामुळे ही शंका उपस्थित केली जात आहे. कारण त्यांनी त्यांच्या पुस्तक प्रकाशनात त्यांचा कार्यकाळ 6 जानेवारी 2022 ते 29 जून 2022 असा लिहला, तोदेखील 20 जूनच्या पत्रात उल्लेख केल्यामुळे ही शंका उपस्थित झाली आहे.

Former Energy Minister Nitin Raut Letter
काँग्रेस नेते नितीन राऊतांचे पत्र

नागपूरराज्यात मोठ्या राजकीय घडामोडीनंतर सत्ताबदल झाला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांचे Uddhav Thackeray Government Collaps सरकार जाऊन शिंदे-फडणवीस यांचे सरकार सत्तेवर आले आहे. परंतु, माजी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना उद्धव ठाकरे यांचे सरकार नेमके कधी कोसळणार हे आधीच माहिती Former Energy Minister Nitin Raut Know Exactly होते का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिवांना लिहिलेल्या एका पत्रामुळे ही शंका उपस्थित केली जात आहे. २१ जून रोजी एकनाथ शिंदे त्यांच्या समर्थक आमदारांसह आधी सुरत आणि नंतर गुवाहाटीला पोहचले. तेव्हापर्यंत महाविकास आघाडी सरकारचे भविष्य अधांतरीच होते.

राज्यातील या अभूतपूर्व सत्ताबदलांनंतर शिंदे गटाची सत्ता राज्यातील या अभूतपूर्व सत्ताबदलांनंतर ३० जून रोजी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची व देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यादरम्यान नितीन राऊत यांनी त्यांच्या ऊर्जामंत्री Nitin Raut had Written Letter to Principal Secretary म्हणून केलेल्या कामावर कॉफी टेबल बुक प्रकाशित करण्यासाठी २० जून रोजी ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिवांना पत्र लिहिले होते. या पत्रात ६ जानेवारी २०२० रोजी त्यांनी ऊर्जामंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला, तर २९ जून २०२२ रोजी मंत्रिपद समाप्त होत आहे. या ९०६ दिवस ते ऊर्जामंत्री राहिले. त्यांच्या कार्यकाळात महावितरण, महाजेनको, महापारेषण आदी कंपन्यांमध्ये कसे आमूलाग्र बदल करण्यात आले. वीज दर कमी करण्याचा दावाही त्यांनी या पत्रात केला. यासंदर्भात कॉफी टेबल बुक प्रकाशित करायला हवे असे राऊत यांनी पत्रात स्पष्ट केले आहे.


सत्ता नाट्य घडण्यापूर्वीच नितीन राऊतला कल्पनाआश्चर्याची बाब म्हणजे राऊत यांना ही सर्व माहिती २० जून रोजी लिहिली आहे. जेव्हा की एकनाथ शिंदे हे २१ जून रोजी समर्थक आमदारांसह सुरतला पोहचले. आता माजी ऊर्जामंत्री डॉक्टर नितीन राऊत यांना महाविकास आघाडीचे सरकार २९ जूनपर्यंतच राहील याचे पूर्वज्ञान कुठून आणि कसे आले हे मात्र एक कोडेच आहे.

हेही वाचाGaneshotsav 2022 : दगडूशेठ गणपती ट्रस्ट आयोजित अथर्वशीर्ष पठणाला महिलांची विक्रमी उपस्थिती, ३१ हजार महिलांनी केला मंत्रोच्चार

ABOUT THE AUTHOR

...view details