महाराष्ट्र

maharashtra

Prakash Ambedkar on Imperial Data : इम्पेरिकल डाटा गोळा करण्याचा अधिकार मागासवर्ग आयोगाला आहे का? प्रकाश आंबेडकर यांचा सवाल

By

Published : Dec 27, 2021, 8:02 AM IST

Updated : Dec 27, 2021, 1:25 PM IST

ओबीसीचा इम्पेरिकल डेटासाठी गणना करण्याचे अधिकार मागासवर्ग आयोगाला आहे का? असा प्रश्न वंचितचे संस्थापक अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबींचा खुलासा करावा तसेच राष्ट्रवादीचे नेते नवाब मालिक यांचीही भूमिका संघाप्रमाणे मुस्लिम विरोधी असल्याचीही टीका त्यांनी बोलताना (Prakash Ambedkar in Nagpur) केली.

prakash ambedkar
प्रकाश आंबेडकर

नागपूर -सरकार मागासवर्ग आयोगाच्या मार्फत इम्पेरिकल डेटा गोळा ( prakash ambedkar on Imperial Data ) करण्याच्या अट्टाहास करत आहे. पण खरोखरच ओबीसीचा इम्पेरिकल डेटासाठी गणना करण्याचे अधिकार मागासवर्ग आयोगाला आहे का? असा प्रश्न वंचितचे संस्थापक अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला. ते नागपुरात रवी भवन येथे माध्यमांशी बोलत होते. मुख्यमंत्र्यांनी याबाबींचा खुलासा करावा तसेच राष्ट्रवादीचे नेते नवाब मालिक यांचीही भूमिका संघाप्रमाणे मुस्लिम विरोधी असल्याचीही टीका त्यांनी बोलताना (Prakash Ambedkar in Nagpur) केली.

नागपूरात प्रकाश आंबेडकर
मागास आयोगाची निर्मिती करताना राज्य सरकारने आयोगाच्या टर्म्स एन्ड कंडिशनमध्ये तशी डेटा गोळा करता येईल आणि तो डेटा सर्वोच्च न्यायालयात ग्राह्य धरता येईल, अशी तरतूद केली आहे का? याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी करावा. न्यायालयात जर हा प्रश्न समोर आला तर आयोगाला तो अधिकार होता का हे स्पष्ट करावे लागतील. त्यामुळे राज्य सरकारने आज यात लक्ष घातले नाही, तर भविष्यात मराठा आरक्षणाच्या बाबतीत जे घडले तेच ओबीसीच्या आरक्षणा संदर्भात घडल्याशिवाय राहणार नाही, अशी शक्यता प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे.
तर भविष्यात ओबीसीचे शैक्षणिक आरक्षण जाण्याची भीती -


सध्या महाराष्ट्रात हिवाळी अधिवेशन सुरू आहे. विधानसभेत कायदा मंजूर करून त्यामाध्यमातून केंद्रांच्या जनगणना आयोगाकडे संपर्क साधावा आणि त्यांच्या मार्फत ओबीसींची आवश्यक गणना करून घेत सर्वोच्च न्यायालयाने मागितलेली माहिती द्यावी. राज्य सरकारने तसे केले नाही, तर ओबीसींचे शैक्षणिक आणि नोकरी विषयक आरक्षण ही भविष्यात संपुष्टात येण्याची भीती एड प्रकाश आंबेडकर यांनी ( Prakash Ambedkar on Obc Reservation ) व्यक्त केली आहे.

नवाब मालिकांची भूमिका मुस्लिम आरक्षण विरोधी -


मुस्लिमांना पाच टक्के आरक्षण मान्य करून जीआर काढण्यात आला होता. या विरोधात मुंबई हायकोर्टमध्ये याचिका दाखल केल्यानंतर आरक्षण मुस्लिमांचे पाच टक्के आरक्षण कायम ठेवले. नवाब मलिक यांनी पन्नास टक्क्यांची मर्यादा घालून दिली म्हणत भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे नवाब मालिकांची ( Prakash Ambedkar on Muslim Reservation ) भूमिका ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाप्रमाणेच मुस्लिम विरोधी असल्याचे दिसून आले, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

ओबीसींनी स्वतःत साठी स्वतः लढावे -

त्यामुळे आता मुस्लिमांनीच ठरवावे की त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि नवाब मालिकांच्या मागे उभे राहावे की नाही असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. चारही पक्षांची मानसिकता अशी आहे की ओबीसींना आरक्षण मिळू नये. त्यामुळे ओबीसी आता स्वतःचा हक्कासाठी स्वतः लढा उभारावा असेही एड प्रकाश आंबेडकर बोलतांना म्हणाले आहे.

हेही वाचा -Peacocks Born Form Landor: लांडोरच्या अंड्यांतून प्रथमच मोरांचा जन्म

Last Updated :Dec 27, 2021, 1:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details