महाराष्ट्र

maharashtra

Political Crisess in Maharastra : एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ लावलेले बॅनर युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी फाडले

By

Published : Jun 25, 2022, 5:25 PM IST

शिवसेना नेते एकनाथ शिंदे ( Rebel Eknath Shinde ) यांनी बंड केल्यानंतर त्यांच्यासोबत अनेक आमदार गेल्याने शिवसेनेत उभी फूट ( Vertical split in Shiv Sena ) पडली. त्यामुळे शिवसेना आक्रमक झाली ( Shiv Sena On Action Mode ) असून, अनेक बंडखोर आमदारांची कार्यालये फोडण्यात आली. नागपूरमध्येसुद्धा युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदेच्या बॅनरला काळे फासून बॅनर फाडले आहे. महाल परिसरात ( In The Mahal Area of Nagpur ) एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ आज वीर बजरंगी सेवा संस्थानच्या महेश झाडे यांनी हे बॅनर लावले होते.

Eknath Shinde Banner was Torn Down
एकनाथ शिंदे यांचे बॅनर फाडले

नागपूर :नागपूरच्या महाल परिसरात ( In The Mahal Area of Nagpur )शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे ( Rebel Eknath Shinde ) यांच्या समर्थनार्थ आज वीर बजरंगी सेवा संस्थानच्या महेश झाडे ( Mahesh Zade of Veer Bajrangi ) यांनी महाल शेजारी असलेल्या चितारओळी भागात एक बॅनर लावलं होतं. मात्र, युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदेच्या बॅनरला काळे फासून बॅनर फाडले आहे.

एकनाथ शिंदे समर्थनार्थ लावले होर्डिंग : महाल परिसरातील चितारओळ परिसरात एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ होर्डिंग लावण्यात आले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालयापासून केवळ 400 मीटरच्या आत हा परिसर येतो. या ठिकाणी महेश झाडे या बजरंगी सेवा संस्थानच्या कार्यकर्त्याने चितारओळी परिसरात सकाळी बॅनर लावले होते.

युवा सेना कार्यकर्त्यांनी फाडले बॅनर : याबाबतची माहिती दुपारी युवा सेनेच्या कार्यकर्त्यांना समजताचं त्यांनी एकनाथ शिंदेच्या बॅनरवर काळी शाई लावून बॅनर फाडून निषेध नोंदवला आहे. यानंतर शिवसेना बंडखोरांचे बॅनर लावल्यास युवा सेना आक्रमक ( Shiv Sena On Action Mode ) होऊन बॅनर फडण्याचे काम करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

काय लिहिलं होतं बॅनरवर : सध्याच्या नाट्यात शिंदे गटाचे पारडे जड होत आहे. एकनाथ शिंदे यांच्या समर्थनात नागपुरातदेखील बॅनर झळकले होते. त्यामध्ये "राजतिलक की करो तयारी आ रहे है भगवाधारी"."लोकांचा लोकनाथ एकनाथ" असा आशय या बॅनरवर प्रदर्शित करण्यात आला आहे. शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्ववादी विचार आत्मसात करणारे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण पुढे घेऊन जाणारे एकनाथ शिंदे, असे लिहून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या होत्या.

हेही वाचा :Maharashtra Political Crisis : एकनाथ शिंदेचं बंड, शिवसैनिकांची तोडफोड; मुंबईत 'या' तारखेपर्यंत जमावबंदी लागू

ABOUT THE AUTHOR

...view details