महाराष्ट्र

maharashtra

ST Worker Agitation At Nitin Raut House : एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंदर्भात राज्य सरकार प्रयत्नशील - नितीन राऊत

By

Published : Feb 27, 2022, 3:42 PM IST

एसटी कर्मचारी ( ST Worker Agitation In Maharashtra ) गेल्या अनेक महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. आज एसटी कर्मचाऱ्यांनी नागपूरचे पालकमंत्री आणि राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत ( ST Worker Agitation At Nitin Raut House ) यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केले. यासंदर्भात पालकमंत्री नितीन राऊत ( Nitin Raut Reaction On ST Worker Agitation ) यांनी प्रतिक्रिया दिली. b

ST Worker Agitation At Nitin Raut House
ST Worker Agitation At Nitin Raut House

नागपूर -विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचारी ( ST Worker Agitation In Maharashtra ) गेल्या अनेक महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. आज एसटी कर्मचाऱ्यांनी नागपूरचे पालकमंत्री आणि राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत ( ST Worker Agitation At Nitin Raut House ) यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केले. यासंदर्भात पालकमंत्री नितीन राऊत ( Nitin Raut Reaction On ST Worker Agitation ) यांनी प्रतिक्रिया दिली. एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न ज्वलंत आहे. हा विषय त्यांच्या पोटाशी आणि जीवाशी संबंधित आहे, असे ते म्हणाले. तसेच राज्य शासन यासंदर्भात प्रयत्नशील असल्याची माहितीही त्यांनी दिली.

'संबंधितांवर कारवाई होईल' -

मुंबईत विद्युत पुरवठा ( Electricity Break In Mumbai ) खंडित होणासंदर्भात बोलताना पालकमंत्री म्हणाले, मुंबईत आज सकाळी 220 केवीच्या लाईनवर काही तांत्रिक बिघाड झाल्याने विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. एक कंडक्टर तुटले होते. त्यामुळे मोठा वीज पुरवठा काही वेळासाठी खंडित झाला होता. आता वीज पूर्ववत झाली आहे. काळजी करण्याचे कारण नाही. संबंधितांवर कारवाई होईल, अशीही माहिती ऊर्जामंत्री राऊत यांनी दिली. सध्या महाराष्ट्रात राजकारण कशाप्रकारे चालले ते सगळ्यांसमोर आहे. आम्ही कोर्टाचा सन्मान करतो. ज्या प्रमाणे कोर्ट निर्देश देईल त्याप्रमाणे आम्ही काम करू, असेही ते म्हणाले.

'त्या व्यक्तीशी माझा काहीही संबंध नाही' -

राज्यात सध्या आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरू आहे. ज्यांनी आरोप-प्रत्यारोप सुरू केलेले आहे, त्यांनी वातावरण दूषित केलेल आहे. ही फार मोठी शोकांतिका आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांच्या पदाची गरिमा असते. त्याच्यावर कोणी जर विधायक अशाप्रकारे बोलत असेल, तर ते योग्य नाही. पालकमंत्री नितीन राऊत आणि त्यांच्या मुलावर मकोकाच्या आरोपीचे फोटो असल्याचा आरोप लावल्यानंतर यासंदर्भात बोलताना माझा त्या व्यक्तीशी काहीही संबंध नाही, असे राऊत म्हणाले.

हेही वाचा -Mann Ki Baat : 'मन की बात' मध्ये पंतप्रधान मोदींनी मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या

ABOUT THE AUTHOR

...view details