महाराष्ट्र

maharashtra

Sharad Pawar on Violence : त्रिपुरामधील घटनेचे महाराष्ट्रात रिऍक्शन, यामागे षडयंत्र तर नाही? - शरद पवार

By

Published : Nov 17, 2021, 8:28 PM IST

त्रिपुरा(Tripura Violence) येथे घडलेल्या घटनेची रिऍक्शन महाराष्ट्रात का उमटली हे देखील तपासणे गरजेचे आहे. यामागे षडयंत्र आहे का? याचा सखोल तपास करण्याची सूचना राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना केली असल्याची माहिती शरद पवार(Sharad Pawar on Amravati Violence) यांनी दिली आहे.

sharad pawar
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार

नागपूर -अमरावती येथे झालेली दंगल ही पूर्वनियोजित होती. एका विशिष्ट पक्षाचा त्यात सहभाग असल्याचे बोलले जात आहे. यासंदर्भात एक अहवाल देखील पुढे आलेला आहे. मात्र, मला त्या संदर्भात फारशी माहिती नसल्याचा खुलासा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(NCP Chief Sharad Pawar) यांनी केला आहे.

आजपासून शरद पवार यांच्या विदर्भ दौऱ्याला(Sharad Pawar Vidarbha Daura) नागपूरमधून सुरुवात झाली आहे. त्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्रिपुरा(Tripura Violence) येथे घडलेल्या घटनेची रिऍक्शन महाराष्ट्रात का उमटली हे देखील तपासणे गरजेचे आहे. यामागे षडयंत्र आहे का? याचा सखोल तपास करण्याची सूचना राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना केली असल्याची माहिती शरद पवार(Sharad Pawar on Amravati Violence) यांनी दिली आहे.

  • निवडणुकांमध्ये फायद्यासाठी दंगली - शरद पवार

त्रिपुरा येथे घडलेल्या घटनेचे राजकारण सुरू आहे. केवळ निवडणुकांमध्ये फायदा घेण्याच्या उद्देशानेच अमरावती, नांदेड आणि मालेगाव येथे दंगली भडकवण्यात आल्या असल्याची माहिती असल्याचे देखील शरद पवार म्हणाले आहेत. रझा अकॅडमीवर बंदी घालण्याची मागणी जोर धरत आहे. त्यामुळे संपूर्ण बाजू तपासल्यानंतरच निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले आहे.

  • सत्ता गेल्याने फडणवीस अस्वस्थ -

राज्यात महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले, तेव्हापासूनच देवेंद्र फडणवीस यांची अस्वस्थता वाढली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये त्यांनी केलेल्या वक्तव्यातून त्यांची अस्वस्थता खूप वाढली असल्याचे दिसत आहे, असा टोला शरद पवार यांनी फडणवीस यांना लावला आहे. एखाद्या संवेदनशील प्रकरणावर बोलताना त्यांनी संयम बाळगणे गरजेचे असल्याचा सल्ला पवार यांनी फडणवीस यांना दिला आहे.

  • अनिल देशमुख यांच्यावर अन्याय -

शंभर कोटी वसुली प्रकरणात आरोप झाल्यानंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. मात्र, त्यांच्यावर ज्या परमबीर सिंग यांनी आरोप केलेत ते आज कुठे आहेत? असा प्रश्न शरद पवार यांनी उपस्थित केला. आरोप करणारेच फरारी आहेत, वस्तुस्थिती सांगायला तयार नाहीत. त्यामुळे या प्रकरणात अनिल देशमुख यांच्यावर अन्याय होत आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने यावर सविस्तर बोलणार नसल्याचे शरद पवार म्हणाले.

  • नाना पटोले यांना टोला -

दोन दिवसांपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादीला डिवचण्याचा प्रयत्न केला होता. ते म्हणाले होते की, पुढील निवडणुकीत विदर्भातून राष्ट्रवादीचे दुकान बंद करू, यावर शरद पवार यांनी उत्तर दिले आहे. आमची विचारधारा ही महात्मा गांधी आणि नेहरूंची आहे. काँग्रेस पक्षाशी आमची भूमिका मिळते. त्यामुळे आम्ही सोबत आहोत. मात्र, ज्या नेत्याने भाजपकडून लोकसभा आणि विधानसभा लढवली आहे, ते त्याच मानसिकतेतून आरोप करत असल्याचा टोला शरद पवार यांनी नाना पटोले यांना लावला आहे.

  • आले तर सोबत नाही तर....

आगामी नागपूर महानगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकत्र लढणार का? या प्रश्नावर शरद पवार म्हणाले की, एकत्र लढल्यास नक्कीच फायदा होईल. त्यामुळे एकत्र आले तर सोबत लढू अन्यथा एकटे लढू.

  • ...तर पेट्रोल डिझेलचे दर कमी करण्यासंदर्भात निर्णय होईल -

केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलचे दर कमी केल्यानंतर अनेक राज्यांनी कर कमी करून जनतेला दिलासा दिला आहे. महाराष्ट्र्रातसुद्धा पेट्रोल-डिझेलवरील कर कमी करण्याची मागणी केली जात आहे. या संदर्भात शरद पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, केंद्र सरकारने जीएसटीचा परतावा राज्याला दिल्यास या संदर्भातील निर्णय घेण्यात येईल.

ABOUT THE AUTHOR

...view details