महाराष्ट्र

maharashtra

Flyovers closed in Nagpur : मांजाची धास्ती! 'या' शहरातील सर्व उड्डाणपूल मकर संक्रातीच्या दिवशी बंद

By

Published : Jan 14, 2022, 3:42 PM IST

नागपूर उड्डाणपूल बंद
नागपूर उड्डाणपूल बंद

गेल्या काही वर्षांतील घटना लक्षात घेता दरवर्षी शहरातील उड्डाणपूल बंद ठेवले ( All flyover closed in Nagpur ) जातात. यावर्षी या निर्णयाची प्रभावीपणे अंमलबजावणी करताना पोलीस दिसून येत आहेत. प्रत्येक पुलाच्या दोन्ही टोकाला पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला ( Police Bandobast at Nagpur flyovers ) आहे.

नागपूर-एकीकडे मकर संक्रांतीच्या दिवशी पंतगबाजीचा आनंद लुटला जात आहे. दुसरीकडे चीनी मांज्यामुळे जीवितास धोका उत्पन्न होत असल्याने काळजी घेतली ( threat of Manja to two wheeler rider ) जात आहे. पतंगबाजी करताना वाहतुकदारांच्या जीवितास धोका होऊ नये, या उद्देशाने आज नागपूर शहरातील सर्व प्रकारचे लहान-मोठे उड्डाणपूल बंद ठेवण्यात आले ( All flyover closed in Nagpur ) आहे.

गेल्या काही वर्षांतील घटना लक्षात घेता दरवर्षी शहरातील उड्डाणपूल बंद ठेवले जातात. यावर्षी या निर्णयाची प्रभावीपणे अंमलबजावणी करताना पोलीस दिसून येत आहेत. प्रत्येक पुलाच्या दोन्ही टोकाला पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला ( Police Bandobast at Nagpur flyovers ) आहे.
हेही वाचा-Kamal Khan Passes Away : ज्येष्ठ पत्रकार कमाल खान यांचे निधन; पत्रकारिता विश्वात शोककळा

दुचाकी चालकांच्या गळयात मांजा अडकण्याची असते भीती-
उपराजधानी नागपुरात अनेक मोठे उड्डाणपुल आहेत. यामध्ये चार किलोमीटर लांबीच्या उड्डाणपूलाचा समावेश आहे. यावरून दरदिवशी हजारो वाहन ये-जा करतात. आज मकरसंक्रांतीच्या दिवशी शहरात मोठ्या प्रमाणात पतंगबाजी असते. त्यामुळे पुलावरून जाणाऱ्या दुचाकी चालकांच्या गळयात मांजा अडकून एकाद्याचा जीवदेखील जाऊ शकतो. या पार्श्वभूमीवर शहरातील प्रत्येक भागातील उड्डाणपूल आज संपूर्ण दिवसभर वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलेले आहेत.

हेही वाचा-khaire Vs karadh : मेट्रो वरून राजकारण सुसाट, श्रेयासाठी सेना - भाजपात स्पर्धा

भुतकाळातील घटनांची पुनरावृत्ती टाळण्याकरिता उपाय
पतंग कापली गेल्यानंतर नायलॉन मांजा रस्त्यांवर पडल्यामुळे उपराजधानी नागपुरात अनेकांचा जीव गेलेला ( deaths in Nagpur due to Manja ) आहे. यावर्षीही काही घटना घडल्या आहेत. अशा घटनांमध्ये अनेक नागरिक जखमी झाले आहेत. तर गेल्या काही वर्षात अनेकांचा जीव गेलेला आहे. त्यामुळे मकरसंक्रातीच्या दिवशी शहरातील पुलांवरील वाहतूक बंद ठेवली जाते.

ABOUT THE AUTHOR

...view details