महाराष्ट्र

maharashtra

International Nurses Day 2022 : 'आंतरराष्ट्रीय नर्सेस डे' : जाणून घेऊयात कोरोना काळातील नर्सेसचे अनुभव..

By

Published : May 12, 2022, 10:25 AM IST

आज आंतरराष्ट्रीय नर्सेस दिवस ( International Nurses Day 2022 ) आहे. त्यानिमित्त ईटीव्ही भारत प्रतिनिधीने परिचारिकांशी संवाद साधला. कोरोना काळात आलेल्या विविध अनुभवांना या परिचारिकांनी व्यक्त ( Nurses Experiences During Covid Period ) केले. तर पाहुयात स्पेशल रिपोर्ट..

International Nurses Day 2022
आंतरराष्ट्रीय नर्सेस डे

नागपूर : रुग्णालयात डॉक्टरांना देवाचा दुसरं रूपच मानले जाते. यासोबतच रुग्णालयात रुग्ण सेवा करणाऱ्या परिचारिकाना नर्स किंवा सिस्टर म्हणजे त्यांना बहिणींचा दर्जा दिला आहे. दोन वर्षांनी यंदा 12 मे रोजी जागतिक नर्सेस डे साजरा होत आहे. मागील दोन वर्ष कोरोनाच्या महामारीत रुग्णसेवा देण्यासाठी डॉक्टच्या खांद्याला खांदा लावून रुग्ण सेवा देणाऱ्या परिचारिकासाठी आनंदाचा आणि खास दिवस ( International Nurses Day 2022 ) आहे. यावर नागपूरच्या इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज तथा रुग्णालयात ( Indira Gandhi Medical College ) सेवा देणाऱ्या परिचारिकाचा अनुभव जाणून ( Nurses Experiences During Covid Period ) घेतलाय ईटीव्ही भारताच्या खास रिपोर्ट मधून..


जागतिक नर्स दिवस साजरा होताना नागपूरात कोरोनाच्या दिवस कायमचे स्मरणात राहणारे आहे. कोरोनाच्या काळात जिथे कोणीही मदत करू शकत नव्हते, आप्तस्वकीय पोहचू शकत नव्हते तिथे परिचारिकानी रुग्णसेवा करत अनेकांना आधार दिला. ईटीव्ही भारतशी बोलताना त्यांनी अनुभव कथन केलेत. सहाय्यक अधिसेविका ममता ठवरे यांनी सांगितले की, रुग्णसेवा करण्याचे ध्येय घेऊन या क्षेत्रात आले. महाराष्ट्रातील अनेक रुग्णालयात रुग्णसेवा केल्याचे समाधान आहे. पण कोरोनातील दोन वर्षे हे वेगळ्या अनुभवाची शिदोरी देणारे आहे. सहकारी परिचरिकेने एकमेकास साह्य करत या महामारीत उत्तम काम करत रुग्णसेवा केल्याचा आनंद आहे. काम करता करता कोरोना पॉझिटिव्ह झाले. प्रत्येकाने घरच्यांची कुठलीही चिंता न करता आपले काम चोख बजवल्याने रुगणालयात सेवा देऊ शकलो आणि रुग्णाचे हसरे चेहरे आमच्यासाठी समाधान देणारे होते असे ममता ठवरे यांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय नर्सेस डे


बेड अपुरे असतांना स्टाफ नसतांना रुग्णसेवा दिली :यंदा दोन वर्षांनी का होईना 12 मे जागतिक नर्सेस दिवस उत्साहात सजारा करण्याचा निर्धार केला. आजचा दिवस विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले. कोरोना वार्डात कर्तव्य 281 परिचारिकांनी केले. 500 पेक्षा बेडचे रुग्णालयात मागे न हटता 115 पद रिक्त असताना काम केले. कामाचा ताण न विचारता घेता एका- एका परिचरिकेने 35 ते 40 रुग्ण एकाच शिफ्टमध्ये सांभाळण्याचे काम केले. मागील 29 वर्षांपासून प्रदीर्घ काळ रुग्णसेवेच अनुभव असलेल्या विभागीय परिचारिका चंद्रकला परतेकी यांनी अशी महामारी पाहिलीच नाही. सामान्य रुग्णासोबत कोरोना रुग्ण सांभाळण्याचे काम दुसरीकडे घराची जबाबदारी, घरात कोणाला कोरोना होऊ नये यासाठी वेगळाच ताण मनावर असयचा, असे परतेकी सांगतात.


असे दिवस कोणावरही येऊ नये :कोरोना वार्डात कुटुंबीय नसल्याने रुग्णांना आपलस वाटावं, मन मोकळं करण्यासाठी कोणीही नसायचे. पीपीई किट घालून जेव्हा वार्डात शिरलो तेव्हा प्रत्येक रुग्ण आपले दुःख सांगायचे. कुटुंबीय नाही पण सिस्टर काळजी घेत असायचे. तेव्हा आपले कुटुंबीय आपल्या सोबत नसावे असा दिवस कोणाचाही जीवनात होऊ नये असे वाटत. तो दिवस कायम आठवणीत आहे. 29 वर्षाच्या कार्यकाळात अनेकदा रुग्ण शस्त्रक्रियेसाठी आले की, जीवन मृत्यूशी झुंज देताना पाहिले. पण रुग्ण बरा होतो तेव्हा आनंद आणि रुग्णसेवेच काम करत असल्याचे वेगळेच समाधान देऊन जात असल्याचे निर्मला सोमकुवर यांनी ईटीव्हीशी बोलतांना सांगितले.


एकाच वेळी अनेक भूमिका :परिचारिका मिनाक्षी खोब्रागडे सांगतात, आम्ही फक्त परिचारिका नसतो. कधी रुग्णांसाठी नातेवाईक, कधी बहीण म्हणून काम करतो. पण त्यावेळी इतके कठीण प्रसंग आले की, घरात मुलगा आणि पती कोरोना पॉझिटिव्ह असताना सुध्दा सुट्टी घेऊ शकत नव्हतो. कारण इकडे अतिशय गंभीर रुग्ण सोडून पाय घराकडे वळत नव्हते. कारण त्या रुग्णाला आमची अधिक गरज होती, असा अनुभव मिनाक्षी यांनी सांगितला. तेच रागिणी कमिलकर सांगतात की, त्यांच्यावर कुटुंबीय जाऊ शकत नसल्याने आम्हाला त्यांचा आधार व्हावे लागले. परिचारिका, कुटुंबीय, कर्मचारी, बहीण नातेवाईक, यासह अनेक भूमिका वाटवल्या लागल्या. पण परिचारिका म्हणून काम करत असल्याचा सार्थ अभिमान आहे, असेही रागिणी यांनी सांगितले.

हेही वाचा : Happy International Nurses Day: सचिनने नर्सेसच्या सन्मानार्थ बदलला डीपी, लिहला 'हा' खास संदेश

ABOUT THE AUTHOR

...view details