महाराष्ट्र

maharashtra

पोलिसांनी 'ती' नोटीस तपासाच्या अनुषंगाने लावली ; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची प्रतिक्रिया

By

Published : Dec 30, 2021, 8:19 PM IST

संतोष परब मारहाण प्रकरणावरून ( Santosh Parab case ) सध्या वेगवेगळी चर्चा केली जात आहे. यावर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील ( Home Minister Dilip Walse-Patil's ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते नागपूर विमानतळावर माध्यामांशी बोलत होते.

नागपूर :सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या संतोष परब मारहाण प्रकरणावरून ( Santosh Parab assault case ) वाद शिगेला पोहोचलेला आहे. विशेष करून केंद्रीय मंत्री नारायण राणे व त्यांचे पुत्र भाजप आमदार नितेश राणे ( BJP MLA Nitesh Rane ) यांच्या अटके संदर्भांमध्ये चर्चा वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. यावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

दिलीप वळसे-पाटील
पोलीस ज्या वेळेला एखाद्या गुन्ह्याचा तपास करत असतात, त्या वेळेला कायद्याने ज्या गोष्टीचे संमती त्यांना दिलेली असते, त्याच गोष्टीचा ते तपास करू शकतात. त्यामुळे मला असं वाटते (नितेश राणे) यांच्या घरी नोटीस लावली आहे. ती नोटीस तपासाच्या अनुषंगाने लावली असावी. असे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील ( Home Minister Dilip Walse Patil ) यांनी नागपुर विमानतळावर पत्रकारांशी बोलताना सांगितले.राज्याचे विरोधीपक्ष नेते यांनी केलेल्या ट्विटरवर प्रश्न विचारला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पोलीस स्टेशन मध्ये जाऊन जवाब देणे किंवा त्यांच्या घरी जाऊन जवाब नोंदवणे त्यांना दोन्हीपैकी ज्या गोष्टी शक्य आहेत. त्या संदर्भात चर्चा सुरू आहे. असे ही गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले आहेत. तसेच कालीचरण महाराजांचा ( Kalicharan Maharaj ) ताबा महाराष्ट्र पोलीस ( Maharashtra Police Department ) नक्कीच घेणार आहेत. कारण राष्ट्रपितावर अशा पद्धतीने वक्तव्य करणे हा खूप मोठा गुन्हा आहे. खरं तर यामध्ये राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. पण महाराष्ट्रात जिथे जिथे गुन्हे दाखल झाले आहेत. त्या ठिकाणी पोलिस ताब्यात घेतील असे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील बोलताना म्हणाले.
नारायण राणे यांना पाठवलेल्या पोलिसांच्या नोटीसमध्ये नेमकं काय?
कणकवली पोलिसांनी ( Kankavali police notice ) पाठवलेल्या नोटीसमध्ये नारायण राणे यांनी गुन्ह्याच्या तपासासाठी हजर राहावं असं म्हटलं आहे. इतकंच नाही तर नितेश राणे हे आरोपी असून, त्यांचा शोध लागत नाही. या आरोपीचा शोध जारी आहे. आपण काल पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी या खटल्याबाबत आक्षेपार्ह विधान केलं आहे. आरोपी नितेश राणे कुठे आहेत? असा प्रश्न विचारला होता.

त्यावर तुम्ही 'नितेश राणे कुठे आहे हे सांगायला मी मूर्ख वाटलो का' असं म्हटलं. या विधानावरुन नितेश राणे कुठे आहेत याची संपूर्ण माहिती तुम्हाला आहे. त्यामुळे ही नोटीस मिळताच तुम्ही आरोपी नितेश राणे यांना पोलिसांसमोर हजर करा. तसंच या गुन्ह्याबाबत जबाब नोंदवण्यासाठी कणकवली पोलिसात २९ डिसेंबरला दुपारी ३ वाजता हजर राहावं असं पोलिसांनी म्हटलं आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details