महाराष्ट्र

maharashtra

'पवारांचा कृषी विधेयकाला विरोध नाही, संसदेत घडलेल्या प्रकाराच्या माध्यमातून विरोधकांना पाठिंबा'

By

Published : Sep 22, 2020, 5:27 PM IST

विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांच्या पत्रकार परिषदेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी म्हटले, की शरद पवार यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत कोठेही केंद्र सरकारच्या कृषी विधेयकावर भाष्य केले नाही. त्यांनी फक्त निलंबन केलेल्या खासदारांना पाठिंबा दिला आहे.

bjp leader devendra fadanvis on shard pawar press conference
पवारांचा कृषी विधेयकाला विरोध नाही

नागपूर -राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी पत्रकार परिषद मी ऐकली आहे. त्यात त्यांनी शेती विषयक विधेयकाला कुठेही विरोध केला नसल्याचा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. पवारांनी संसदेत जे घडले आहे, त्यात दोषी असलेल्या खासदारांवर निलंबनाची कारवाई झाली आहे. त्या कारवाईच्या निमित्ताने त्यांनी विरोधी पक्षाला पाठिंबा दिला असल्याचे फडणवीस म्हणाले. एवढंच नाही तर संसद सदस्यांनी अशोभनीय कृती केली नसती तर शरद पवारांना एक दिवसाचा उपवास करावा लागला नसता, असा टोला देखील फडणवीस यांनी लगावला आहे.

पवारांचा कृषी विधेयकाला विरोध नाही
कृषी विधेयकावरून राज्यसभेत घडलेल्ल्या अशोभनीय गदारोळावरून राष्ट्रीय राजकरण ढवळून निघालेले आहे. आठ खासदारांचे निलंबित झाल्यानंतर त्यांनी केलेल्या उपोषणाला उत्तर देण्यासाठी उपसभापती हरीवंश यांनी सुद्धा उपोषण सुरू केल्याने हा वाद चिघळलेला आहे. याच मुद्यावरून आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यावर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यात त्यांनी पवारांचा कृषी विधेयकाला विरोध नसल्याचा दावा केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details