महाराष्ट्र

maharashtra

Navratri Festival Incident at Nagpur : देवीच्या विसर्जन मिरवणुकीत १४ वर्षीय मुलाचा विजेचा शॉक लागून मृत्यू

By

Published : Oct 7, 2022, 10:57 AM IST

Updated : Oct 7, 2022, 11:25 AM IST

नवरात्री संपल्यानंतर दसऱ्याच्या दिवशी देवीचे ( Incident Took Place at Balajinagar Under MIDC ) विसर्जन केले जाते. गणपतीप्रमाणेच देवीची मिरवणूक काढून विसर्जन केले जाते. नागपूर येथील अशाच विसर्जन ( Child Dies During Immersion Procession of Goddess ) मिरवणुकीत एका 14 वर्षीय मुलाचा विजेचा शाॅक लागून मृत्यू झाला. नागपुरातील हिंगणा भागातील एमआयडीसी पोलीस स्टेशनअंतर्गत बालाजीनगर ( Navratri Last Day at Nagpur ) येथे ही घटना ( Navratri Festival Incident at Nagpur ) घडली. पियुषच्या मृत्यूने परिसरात शोककळा पसरली आहे.

Navratri Festival Incident at Nagpur
नागपुरात देवीच्या विसर्जन मिरवणुकीत १४ वर्षीय मुलाचा मृत्यू

नागपूर :नवरात्रीत देवीची घटस्थापनेनंतर ( Child Dies During Immersion Procession of Goddess ) दसऱ्याच्या दिवशी देवीचे विसर्जन केले जाते. देशभरात हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. देवीचे विसर्जन करण्यासाठी निघालेल्या मिरवणुकीत १४ वर्षीय मुलाचा विजेचा शॉक लागून मृत्यू ( Navratri Last Day at Nagpur ) झाल्याची ( Navratri Festival Incident at Nagpur ) घटना नागपूर शेजारी असलेल्या हिंगणा भागातील एमआयडीसी पोलीस स्टेशनअंतर्गत बालाजीनगर येथे घडली ( Navratri Last Day at Nagpur ) आहे. पियुष केशव कावडे असे मृत झालेल्या मुलाचे नाव आहे.

विसर्जन मिरवणुकीत हातातील झेंड्याने केला घात : पियुष हा त्याच्या घराच्या शेजारी विराजमान देवीच्या मूर्तीचे विसर्जन मिरवणुकीत हाती झेंडा घेऊन सहभागी झाला होता. मिरवणूक बालाजीनगर येथे पोहचली. तिथे रस्त्याच्या बाजूला खांबावर असलेल्या विद्युत डिपीला लोखंडी दांडा असलेल्या झेंड्याचा स्पर्श झाला. यात विजेचा धक्का लागल्याने तो खाली कोसळला. मिरवणुकीत सहभागी काही तरुणांनी त्याला डिंगडोह येथील लता मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता काही वेळात त्याचा मृत्यू झाला. एमआयडीसी पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे.

Last Updated :Oct 7, 2022, 11:25 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details