महाराष्ट्र

maharashtra

Aaditya Thackeray : महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना आरोग्याचे धडे - आदित्य ठाकरे

By

Published : May 11, 2022, 10:35 PM IST

‘सुरक्षित शाळा प्रवेश’ या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना आरोग्याचे महत्त्व ( Health Lession On Bmc School Student ) समजवून सांगितले जाईल, असे स्पष्टीकरण पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ( Minister Aaditya Thackeray ) यांनी दिले.

Aaditya Thackeray
Aaditya Thackeray

मुंबई - सुरक्षित शाळा हा प्रत्येक विद्यार्थ्यांचा अधिकार आहे. वाढते शहरीकरण आणि रहदारीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना शाळेत सुरक्षितपणे जाता-येता यावे, या उद्देशाने मुंबईतील महापालिकेच्या शाळांमध्ये ‘सुरक्षित शाळा प्रवेश’ उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना आरोग्याचे महत्त्व समजवून सांगितले ( Health Lession On Bmc School Student ) जाईल, असे स्पष्टीकरण पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी ( Minister Aaditya Thackeray ) दिले.

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत आज ( 10 मे ) मुंबई महानगरपालिकेच्या शाळा परिसरात सुरक्षित शाळा प्रवेश उपक्रमाचा उद्घाटन समारंभ झाला. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, खासदार अरविंद सावंत, मनपाचे सहआयुक्त अजित कुंभार, शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ, मनपाच्या माजी शिक्षण सभापती संध्या दोशी, माजी शिक्षण समिती सदस्य साईनाथ दुर्गे आदी यावेळी उपस्थित होते.

सुरक्षित शाळा उपक्रमांतर्गत शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांची मानसिक आरोग्य, मौखिक आरोग्य, मधुमेह आदींची नियमित तपासणी करण्यात येणार आहे. राज्य आणि देशाची प्रगती करणे आवश्यक असेल तर शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. याच उद्देशाने मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये सध्या आठ भाषांमध्ये शिक्षण दिले जात असून एसएससी प्रमाणेच सीबीएसई, आयसीएसई बोर्डाची शिक्षण सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. लवकरच आंतरराष्ट्रीय बोर्डाची शिक्षण पद्धती देखील सुरू करण्यात येणार आहे. मागील वर्षी मनपाच्या शाळांमधील चार हजार जागांसाठी दहा हजार अर्ज प्राप्त झाले होते. यावर्षी देखील केवळ 15 दिवसांत 35 हजार अर्ज प्राप्त झाल्याचे आदित्य ठाकरेंनी सांगितले आहे.


"राईट टू एज्युकेशन नव्हे तर राईट टू कॉलिटी अँड सेफ एज्युकेशन"-काही वर्षांपूर्वी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची गळती होत असे. आता हे चित्र बदलले असून केवळ ‘राईट टू एज्युकेशन’ नव्हे तर ‘राईट टू कॉलिटी अँड सेफ एज्युकेशन’वर भर दिला जात आहे. विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा शाळेवर आणि शाळेतील शिक्षकांवर विश्वास असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाबरोबरच शाळेतील पायाभूत सोयी-सुविधा आणि अन्य उपक्रम राबविण्याला प्राधान्य दिले जात आहेत. यापुढे सुरक्षित रूग्णालये तसेच सुरक्षित धार्मिक स्थळे हे उपक्रम राबवायचे असून ‘सुरक्षित शाळा प्रवेश’ हा उपक्रम राज्यात सर्वत्र सुरू व्हावा, यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचेही आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे.

"विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न" -शाळांमधून जीवनाला आकार देण्याचे काम केले जाते. या अनुषंगाने महानगरपालिकेच्या शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. यामध्ये आता सुरक्षित शाळा प्रवेश उपक्रमाची भर पडत आहे. सर्वच महानगरपालिकांमधून शैक्षणिक बाबींसाठी निधी खर्च होतो. त्याअंतर्गत शैक्षणिक उपक्रमांसह क्रीडा, आरोग्य, रस्ते सुरक्षा, पायाभूत सोयी-सुविधा, तंत्रज्ञानाचा अंगिकार, दर्जेदार अन्नपुरवठा आदी माध्यमांतून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. सुरक्षित शाळा प्रवेश हा स्तुत्य उपक्रम असून, यापुढे राज्यात सर्व महानगरपालिकांच्या शाळांमध्ये हा उपक्रम राबविला जाईल, असे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

"शैक्षणिक दर्जा जागतिक स्तराचा बनवू या" -माझ्या शैक्षणिक जीवनाची सुरूवात महानगरपालिकेच्या शाळांमधूनच झाली असल्याने या शाळांविषयी जिव्हाळा आहे. या शाळा उत्कृष्टतेचे केंद्र बनण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे मत शिक्षणंत्री वर्षा गायकवाड यांनी मांडले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details