महाराष्ट्र

maharashtra

Corona Update : राज्यात रुग्णसंख्या पुन्हा वाढली; बुधवारी ८६०२ नवे रुग्ण, १७० मृत्यू

By

Published : Jul 14, 2021, 10:09 PM IST

बुधवारी राज्यात ८ हजार ६०२ नवीन रुग्णांचे निदान झाले असून १७० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.०४ टक्के एवढा आहे.

maharashtra corona updates
maharashtra corona updates

मुंबई -गेल्या काही दिवसात कोरोनाचे रोज ८ ते ९ हजार रुग्ण आढळून येत आहेत. गेल्या दोन दिवसात रुग्णसंख्येत काहीशी घट होऊन ७ हजाराच्या घरात रुग्ण आढळून येत होते. बुधवारी(14 जुलै) पुन्हा त्यात वाढ होऊन ८ हजार ६०२ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर १७० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्युदर २.०४ टक्के असून गेले काही दिवस तो स्थिर आहे. बुधवारी ६ हजार ६७ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली.

हेही वाचा -School Reopen : कोरोनामुक्त भागातील आठवी ते बारावीचे वर्ग उद्यापासून होणार सुरू

  • ८ हजार ६०२ नवीन रुग्ण -

बुधवारी ६ हजार ०६७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ५९ लाख ४४ हजार ८०१ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.१७ टक्के एवढा झाला आहे. बुधवारी राज्यात ८ हजार ६०२ नवीन रुग्णांचे निदान झाले असून १७० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.०४ टक्के एवढा आहे. राज्यात आतापर्यंत एकूण १ लाख २६ हजार ३९० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४ कोटी ४६ लाख ०९ हजार २७६ नमुन्यांपैकी ६१ लाख ८१ हजार २४७ (१३.८६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ८० हजार ७७१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,३०९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात एकूण १ लाख ६ हजार ७६४ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

  • या विभागात सर्वाधिक रुग्ण -

मुंबई - ६१९
रायगड - ३६९
अहमदनगर - ४७७
पुणे - ६११
पुणे पालिका - ३५८
सोलापूर - ५८५
सातारा - ६८१
कोल्हापूर - १३७६
सांगली - ७६२
रत्नागिरी - ३२९

  • जुलैमध्ये आतापर्यंतची दैनंदिन रुग्णसंख्या -

14 जुलै - 8602 नवे रुग्ण
13 जुलै - 7243 नवे रुग्ण
12 जुलै - 7603 नवे रुग्ण
11 जुलै - 8535 नवे रुग्ण
10 जुलै - 8296 नवे रुग्ण
9 जुलै - 8992 नवे रुग्ण
7 जुलै - 9558 नवे रुग्ण
5 जुलै - 6740 नवे रुग्ण
4 जुलै - 9336 नवे रुग्ण
3 जुलै - 9489 नवे रुग्ण
2 जुलै - 8753 नवे रुग्ण
1 जुलै - 9195 नवे रुग्ण

हेही वाचा -राज्यात डेल्टा प्लसचा कोणताही नवा रुग्ण नाही - राजेश टोपे

ABOUT THE AUTHOR

...view details