महाराष्ट्र

maharashtra

परतीचा पाऊस...राज्यभरात विविध ठिकाणी वीज पडून अकरा जणांचा मृत्यू

By

Published : Oct 12, 2020, 8:28 AM IST

Updated : Oct 12, 2020, 9:58 AM IST

संपूर्ण राज्यात वीज पडण्याचा घटना घडल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्रात आतापर्यंत अकरा जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये मराठवाड्यात तीन आणि नागपुरातील तिघांचा समावेश आहे. तसेच वाशिममध्ये दोन, सोलापूर एक आणि अमरावतीतील एकाचा समावेश आहे.

retun monsoon in maharashtra
परतीचा पाऊस...राज्यभरात विविध ठिकाणी वीज पडून दहा जणांचा मृत्यू

मुंंबई - राज्यभरात परतीच्या पावसाने हजेरी लावली असून मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाल्याचे आता समोर येत आहे. संपूर्ण राज्यात वीज पडण्याचा घटना देखील घडल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्रात आतापर्यंत दहा जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये मराठवाड्यात तीन आणि नागपुरातील तिघांचा समावेश आहे. तसेच वाशिममध्ये दोन, सोलापूर एक आणि अमरावतीतील एकाचा समावेश आहे. मराठवड्यातील उस्मानाबाद, नांदेड आणि जालन्यात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. तर, अकोल्यातही एका शेतकऱ्याचा मृत्यू झालाय.

दरम्यान, मुसळधार पावसामुळे काढणीला आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यात देखील सरी बरसल्या आहेत. त्यामुळे सोयाबीन, भुईमूग, तूर, कापूस या पिकांच्या शेतात पाणी साठले आहे. यंदा उत्पन्नाचे प्रमाण घटन्याची शक्यता यामुळे वर्तवली जात आहे. आता शेतकरी सर्वसकट पंचनाम्याची मागणी करत आहेत. तसेच पंचनामे करून तत्काळ मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

Last Updated :Oct 12, 2020, 9:58 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details