महाराष्ट्र

maharashtra

CBI Arrests Anil Deshmukh : सीबाआयने अनिल देशमुखांना ताब्यात घेतले; तर याचिकेवरील सुनावणीस न्यायाधीशांचा नकार

By

Published : Apr 6, 2022, 12:14 PM IST

Updated : Apr 6, 2022, 12:44 PM IST

अनिल देशमुखांना सीबीआयच्या कारवाईला समोर जाण्याचे जवळपास नक्की झाले असून त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. न्यायमूर्ती रेवती मोहिती डेरे यांनी ही याचिका दुसऱ्या एकलपीठाकडे सादर करण्याचे निर्देश दिल्यामुळे देशमुखांचे वकील दुपारी पुन्हा न्यायामूर्ती प्रकाश नाईक यांच्या खंडपीठासमोर सुनावणीसाठी याचिका ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे.

Anil Deshmukh
Anil Deshmukh

मुंबई- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उच्च न्यायालयात विशेष CBI न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिले होते. मात्र देशमुख यांच्या याचिकेवर सुनावणीस न्यायाधीशांनी नकार दिला आहे. त्यानंतर सीबीआयने अनिल देशमुखांना ताब्यात घेतले असून बीकेसी कोर्टात हजर करण्यात येईल. ऑर्थर रोड तरूंगातून सीबीआयने देशमुखांचा ताबा घेतले. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. न्यायमूर्ती रेवती मोहिती डेरे यांनी ही याचिका दुसऱ्या एकलपीठाकडे सादर करण्याचे निर्देश दिल्यामुळे देशमुखांचे वकील दुपारी पुन्हा न्यायामूर्ती प्रकाश नाईक यांच्या खंडपीठासमोर सुनावणीसाठी याचिका ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे.

11 एप्रिलपर्यंत सीबीआय कोठडी - सीबीआय अधिकारी अनिल देशमुख यांना ताब्यात घेण्यात अगोदरच शुक्रवारी बाथरूम मध्ये पाय घसरून पडल्याने तीन दिवस जे जे रुग्णालयात भरती करण्यात आले होते. आज त्यांना जे जे रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. अनिल देशमुख यांच्या रुग्णालयात भरती करण्यात आलेल्या प्रकरणावर देखील सीबीआय वकिलांनी आक्षेप घेतला होता. या प्रकरणातील आरोपी सचिन वाझे, कुंदन शिंदे, संजीव पालांडे यांना सीबीआयने 4 एप्रिल रोजी अटक करून ताबा घेतला आहे. तसेच न्यायालयासमोर हजर केल्यानंतर त्यांना 11 एप्रिल पर्यंत सीबीआय कोठडीत पाठवण्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे. त्यावेळी अनिल देशमुख यांच्या संदर्भात जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आल्यावरून सीबीआय वकिलांकडून संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र आता अनिल देशमुख यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर सीबीआय उद्या त्यांचा अर्थर रोड जेलमधून ताबा घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

काय आहे प्रकरण? -मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुखांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांचं वसुलीचं टार्गेट दिलं होतं असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून केला होता. यानंतर निलंबित एपीआय सचिन वाझे यांच्यावरही या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली. तसंच देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही याचप्रकरणात गेल्या दोन महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती. सचिन वाझे सध्या महाराष्ट्र पोलिसांच्या कोठडीत आहे.

Last Updated :Apr 6, 2022, 12:44 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details