महाराष्ट्र

maharashtra

Sudhir Mungantiwar : शिवसेनेकडून प्रस्ताव आला तर त्यावर विचार केला जाईल - सुधीर मुनगंटीवार

By

Published : Jun 27, 2022, 8:30 PM IST

Updated : Jun 27, 2022, 9:48 PM IST

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाला उच्च मंथन करण्यासाठी आजच्या कोर कमिटीची बैठक बोलविण्यात आली होती. शिवसेनेकडून अद्याप कोणताही प्रस्ताव आम्हाला आलेला नाही. एकनाथ शिंदे गट हाच खरा शिवसेनेचा गट असल्याचे सांगतात, भाजपच्या गटाला शिवसेनेचे बंडखोर आमदार मानत नाही. सध्याच्या राजकीय घडामोडींवर भारतीय जनता पक्षाचा बारीक लक्ष आहे. अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. ( BJP core committee meeting )

Sudhir Mungantiwar
सुधीर मुनगुंटीवार

मुंबई - सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाला उच्च मंथन करण्यासाठी आजच्या कोर कमिटीची बैठक बोलविण्यात आली होती. शिवसेनेकडून अद्याप कोणताही प्रस्ताव आम्हाला आलेला नाही. एकनाथ शिंदे गट हाच खरा शिवसेनेचा गट असल्याचे सांगतात, भाजपच्या गटाला शिवसेनेचे बंडखोर आमदार मानत नाही. सध्याच्या राजकीय घडामोडींवर भारतीय जनता पक्षाचा बारीक लक्ष आहे. अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.

सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया

राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीची बैठक देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थान असलेल्या सागर बंगल्यावर झाली. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह मोठ्या नेत्यांची उपस्थिती होती. बहू मतचाचणी संदर्भात आमची कोणतेही अद्याप मागणी नाही, असेही ते म्हणाले. बंडखोर आमदारांच्या प्रस्तावाशी भाजपाचा काहीही संबंध नाही. शिवसेनेकडून प्रस्ताव आला तर त्यावर विचार केला जाईल. अशी प्रतिक्रिया मुनगंटीवार यांनी दिली.

भाजप कोअर कमिटीची बैठक संपन्न झाली. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर, राज्याच्या राजकीय परिस्थितीचे मूल्यांकन आणि चर्चा करण्यात आली. एकनाथ शिंदे म्हणाले की, त्यांचा गट मूळ शिवसेनेचा आहे, यावरही चर्चा झाली. सध्याच्या परिस्थितीत भविष्यात कोणती भूमिका घ्यायची यावर आम्ही चर्चा केली असेही यावेळी मुनगंटीवार यांनी सांगितले.

हेही वाचा -Ulhas Bapat on Maharashtra Political Crisis : 11 जुलै पर्यंत परिस्थितीत जैसे थे वैसे राहणार - घटनातज्ञ उल्हास बापट

Last Updated :Jun 27, 2022, 9:48 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details