महाराष्ट्र

maharashtra

राज कुंद्रा विरोधात अश्लील चित्रपट ॲप खटला चालवण्याकरता सबळ पुरावे, मुंबई पोलिसांचे किल्ला कोर्टात उत्तर

By

Published : Sep 10, 2022, 9:01 PM IST

Updated : Sep 10, 2022, 9:54 PM IST

राज कुंद्राच्या विरोधातील अश्लील चित्रपटांची निर्मिती करणे आणि ते प्रदर्शित करण्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांनी दाखल (pornographic film app case against Raj Kundra) केलेल्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता करण्यात यावी याकरिता अर्ज दाखल केला होता. या अर्जावर मुंबई पोलिसांनी मुंबई महानगर दंडाधिकारी न्यायालयासमोर उत्तर सादर केले. राज कुंद्रा यांचा अर्ज फेटाळण्यात यावा. राज कुंद्रा यांच्या विरोधात खटला पूर्ण करण्यासाठी मुंबई पोलिसांकडे सबळ पुरावे (Strong evidence to file pornographic film app) असल्याचे देखील मुंबई पोलिसांनी सादर केलेल्या उत्तरात म्हटले आहे.

राज कुंद्रा विरोधात अश्लील चित्रपट ॲप खटला चालवण्याकरता सबळ पुरावे
राज कुंद्रा विरोधात अश्लील चित्रपट ॲप खटला चालवण्याकरता सबळ पुरावे

मुंबई -बॉलीवूडची अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती व्यवसायिक राज कुंद्राच्या विरोधातील अश्लील चित्रपटांची निर्मिती (pornographic film app case against Raj Kundra) करणे आणि ते प्रदर्शित करण्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता करण्यात यावी याकरिता अर्ज दाखल केला होता. या अर्जावर मुंबई पोलिसांनी मुंबई महानगर दंडाधिकारी न्यायालयासमोर उत्तर सादर केले. राज कुंद्रा यांचा अर्ज फेटाळण्यात यावा. राज कुंद्रा यांच्या विरोधात खटला पूर्ण करण्यासाठी मुंबई पोलिसांकडे सबल पुरावे असल्याचे देखील मुंबई पोलिसांनी सादर केलेल्या उत्तरात म्हटले आहे (Strong evidence to file pornographic film app). या याचिकेवर पुढील सुनावणी 23 सप्टेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे राज कुंद्रा यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

अश्लील चित्रपटांची निर्मिती करणे आणि ते प्रदर्शित करण्यासाठी मोबाइल ॲप्लिकेशन विकसित केल्याचा आरोप राज कुंद्राविरुद्ध आहे. त्यावरुन प्रथमदर्शनी खटला सुरू करण्यासाठी पुरेशी पुरावे उपलब्ध असल्याचा दावा करत राज कुंद्रा यांनी दाखल केलेल्या निर्दोष मुक्ततेच्या याचिकेवर मुंबई पोलिसांनी आक्षेप घेतला आहे. हॉटशॉट्स नावाच्या ॲपवर त्याचा आणि अश्लील साहित्याच्या विक्रीमध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कोणताही आर्थिक संबंध नाहीत. कुंद्रा यांनी असा दावा करून 20 ऑगस्ट रोजी मुंबई महानगर दंडाधिकारी न्यायालय किल्ला कोर्टात या प्रकारातून दोष मुक्तता करण्यासाठी अर्ज केला होता.


मुंबई पोलिसांनी सांगितले की कुंद्राच्या वकिलांनी मांडलेले कारण त्याला डिस्चार्ज करण्यासाठी पुरेसे नव्हते. त्यात न्यायालयाला सांगण्यात आले की सहआरोपी उमेश कामतकडून जप्त केलेल्या मोबाईल फोनवरून उघड झाले की कुंद्राने मोबाईल ऍप्लिकेशन, एचएस अकाउंट्स, एचएस टेकडाऊन आणि एचएस ऑपरेशन्स हाताळण्यासाठी तीन व्हॉट्सॲप ग्रुप तयार केले होते. या गटातील आरोपी क्रमांक 10 कुंद्रा याने इतर सदस्यांना चित्रपटातील मजकूर, कलाकारांना मिळणारे मानधन आणि ॲपमधून अपेक्षित महसूल याविषयी सूचना देत असे. मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या उत्तरात हे नमुद केले आहे.


मुंबई पोलिसांनी म्हटले आहे की कुंद्राचे व्यावसायिक सहकारी सौरभ कुशवाह यांच्या वक्तव्यावरही विसंबून राहिले. कुशवाहच्या विधानावरून हे स्पष्ट आहे की हॉटशॉट्सवर सामग्री अपलोड करणे आर्म्स प्राइम मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचे ​​कर्तव्य होते. परंतु कुंद्राने कामत आणि रायन थॉर्प यांना हे काम सोपवले जे आर्म्स प्राइम मीडिया प्रायव्हेट लिमिटेडशी संबंधित नव्हते असे म्हटले आहे.

कुंद्रा आणि कुशवाह आर्म्स प्राइम मीडिया प्रायव्हेट लिमिटेडमध्ये संचालक होते. थॉर्प कुंद्राला आयटी सपोर्ट देत होते. पोलिसांच्या नुसार कुंद्राच्या सूचनेनुसार थॉर्पने कथित ॲप तयार केले. डिसेंबर 2019 मध्ये हे ॲप आर्म्स प्राइमकडून केनरिन लिमिटेडकडे देण्यात आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. कुंद्राचा कर्मचारी उमेश कामत याला संपूर्ण भारतातील निर्माते आणि दिग्दर्शकांकडून लैंगिक सुस्पष्ट मजकूर प्राप्त झाला. तो कुंद्राला एक प्रत चिन्हांकित करून केनरिनच्या लंडनस्थित कार्यालयात ईमेलवर पाठवला होता. कुंद्राच्या डिस्चार्ज याचिकेवरील पुढील सुनावणी 23 सप्टेंबर रोजी होणार आहे.


काय आहे नेमके प्रकरण - राज कुंद्रा हा पोर्नोग्राफी प्रकरणातील मुख्य सूत्रधार मानला जात आहे. राज कुंद्राची व्हिआन नावाची कंपनी आहे. तिचे केनरीन नावाच्या कंपनीसोबत टायअप होते. केनरीन ही कंपनी लंडन स्थित आहे. राज कुंद्राच्या भावोजींच्या मालकीची ही कंपनी आहे. त्याचे हॉट शॉट्स नावाचे एक ॲप होते. या कंपनीच्या सर्व कन्टेन्टची निर्मिती या ॲपचे ऑपरेशन्स, अकाउंटिंग राज कुंद्राच्या मालकीच्या व्हिआन या कंपनीच्या मुंबईतील ऑफिसमधूनच होत होते. या प्रकरणाचा सखोल तपास करीत असताना हे सर्व धागेदोरे सापडले आहेत. यामध्ये काही व्हॉट्सअप ग्रुप, ई-मेल्स, अकाऊंट शीट्स सापडल्या आहेत. मुंबई पोलिसांच्या प्रॉपर्टी सेलने पोर्नोग्राफी तयार करण्याच्या गुन्ह्यात राज कुंद्रासह 11 आरोपींना अटक केली आहे.

Last Updated :Sep 10, 2022, 9:54 PM IST

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details