महाराष्ट्र

maharashtra

राज्य सरकारच्या कोविड - १९ सुधारित मार्गदर्शक सूचना जाहीर, मास्क सक्ती उठवली

By

Published : Apr 1, 2022, 10:03 AM IST

कोरोनाचे कडक निर्बंध आणि मास्कसक्तीने गुदमरलेली जनता गुढीपाडव्यापासून मास्कमुक्त आणि कोरोनाच्या निर्बंधापासून संपूर्णपणे मुक्त होणार आहे. सण-उत्सव, यात्रांवरील निर्बंध उठवण्यात आल्याने महाराष्ट्रात गुढीपाडव्यापासून सुरू होणाऱ्या हिंदू नववर्षाचे स्वागत दणक्यात आणि दिमाखात होणार आहे. गुरुवारी मंत्रिमंडळ बैठकीत याबाबतचा निर्णय घेतल्यानंतर राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने आज सुधारित मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.

राज्य सरकारच्या सुधारित मार्गदर्शक सूचना जाहीर
राज्य सरकारच्या सुधारित मार्गदर्शक सूचना जाहीर

मुंबई - कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आल्याने राज्यावर लावलेले निर्बंध मागे घेण्यात आले आहेत. या संदर्भातील सुधारित मार्गदर्शक सूचना राज्य सरकारने आज जाहीर केल्या. मास्क सक्ती यातून उठवली आहे. तरीही आरोग्याच्या सुरक्षेसाठी गर्दीच्या ठिकाणी मास्क घालणे आणि सुरक्षित अंतर राखणे आवश्यक असल्याचे सुचनेत नमूद केले आहे.

कोरोनाचे कडक निर्बंध आणि मास्कसक्तीने गुदमरलेली जनता गुढीपाडव्यापासून मास्कमुक्त आणि कोरोनाच्या निर्बंधापासून संपूर्णपणे मुक्त होणार आहे. सण-उत्सव, यात्रांवरील निर्बंध उठवण्यात आल्याने महाराष्ट्रात गुढीपाडव्यापासून सुरू होणाऱ्या हिंदू नववर्षाचे स्वागत दणक्यात आणि दिमाखात होणार आहे. गुरुवारी मंत्रिमंडळ बैठकीत याबाबतचा निर्णय घेतल्यानंतर राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने आज सुधारित मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.

साथ रोग नियंत्रण कायद्याअंतर्गत लागू केलेले निर्बंध शुक्रवारी १ एप्रिल २०२२च्या रात्री १२ वाजल्यापासून मागे घेण्यात येतील. सर्व जिल्हा प्राधिकरण आपत्ती व्यवस्थापन विभागांना तशा सूचना दिल्या असून अधिकाऱ्यांनी त्याचे काटेकोर पालन करावे. कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी नागरिकांनी कोविड नियमांचे पालन करावे, असा सरकारच्यावतीने सल्ला देण्यात आला आहे. मास्क घालणे, सुरक्षित अंतर राखणे आणि स्वच्छता पाळणे आरोग्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्वाचे आहे.

कोरोनाची रुग्ण संख्या कमी असली तरी राज्यातील सर्व आरोग्य यंत्रणांनी वाढत्या, सक्रिय रुग्णांच्या अनुषंगाने रुग्णालयातील रिक्त खाटांबाबत नियमित जागरूक राहावे. कोरोनाच्या नव्या संक्रमणाबाबत दक्ष असावे. पुन्हा रुग्ण संख्या वाढ होत असल्याचे निरदर्शनास आल्यास राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला सूचित करावे. जेणेकरून संसर्गावर नियंत्रण ठेवणे, शक्य होईल असे मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details