महाराष्ट्र

maharashtra

हसन मुश्रीफ यांच्यावरील आरोपप्रकरणी सोमैया आज राज्यपालांना भेटणार

By

Published : Sep 30, 2021, 12:23 PM IST

हसन मुश्रीफ यांच्यावरील घोटाळ्यांच्या आरोपांप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या आज दुपारी साडेबारा वाजता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे आता राज्यपाल यावर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ/भाजप नेते किरीट सोमैया
ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ/भाजप नेते किरीट सोमैया

मुंबई - ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर केलेल्या घोटाळ्यांचे आरोपांप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या आज दुपारी साडेबारा वाजता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे आता राज्यपाल यावर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुश्रीफ यांनी याविरोधात १०० कोटींच्या अब्रुनुकसानीचा दावा ठोकला

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह त्यांच्या कुटुंबावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केले आहेत. मुश्रीफ यांच्या विरोधात किरीट सोमय्या यांनी तब्बल 2700 पानांचे पुरावे ईडीला सादर केल्याचा दावा सोमय्या यांनी केला होता. मुश्रीफ यांनी याविरोधात १०० कोटींच्या अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे. मुश्रीफ आणि सोमय्या यांच्यात सध्या आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. किरीट सोमय्या यांच्याकडून महाविकास आघाडी सरकारमधील ११ नेत्यांचे घोटाळे उघड केले आहेत. आता मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे तीन आरोप केले आहेत. या संदर्भात सोमय्या आज राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेणार आहेत.

काय आहेत नेमके आरोप काय?

मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबाने कोलकाता स्थित शेल कंपन्यांशी व्यवहार करणाऱ्या डझनभर कंपन्यांचे जाळे तयार केले असून फेक कंपन्यांच्या माध्यमातून उत्त्पन दाखवून त्या नावे उघडलेल्या बँक खात्यातून आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे. हसन मुश्रीफ, त्यांची पत्नी आणि त्यांचा मुलगा नवीद मुश्रीफ यांचे आर्थिक व्यवहार आणि पारदर्शकता नसलेल्या उत्पन्नाबाबतची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आयकर प्राधिकरणाकडे सादर केली आहे. तसेच, हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबाला 100 कोटी रुपये कुठून मिळाले? याची चौकशी केली जावी अशी मागणी किरीट सोमय्या यांनी आयकर, अंमलबजावणी संचालनालय आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली आहे. सर सेनापती संताजी घोरपडे शुगर फॅक्टरी लिमिटेड कोल्हापूरमध्ये आर्थिक घोटाळा आणि मनी लाँड्रिंग झाल्याचा आरोप देखील सोमय्यांनी यावेळी केला आहे.

हेही वाचा -25 वर्ष मेहनत करून राजकारणात आलो, सोमैयांचे आरोप खोटे - हसन मुश्रीफ

ABOUT THE AUTHOR

...view details