महाराष्ट्र

maharashtra

Sharad Pawar on UPA leadership : 'शरद पवारांनी यूपीएचे नेतृत्व करावे'; सिराज मेहंदींच्या आवाहनानंतर पवार म्हणाले...

By

Published : Jan 11, 2022, 7:08 PM IST

Updated : Jan 11, 2022, 7:27 PM IST

भारतीय जनता पक्षाला शह देण्यासाठी यूपीएचे नेतृत्व ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( NCP Leader Sharad Pawar ) यांनी करावे असे आवाहन उत्तर प्रदेशमधील नेते सिराज मेहंदी यांनी ( Siraj Mehndi appeal to Sharad Pawar ) केले आहे. यावर शरद पवार पत्रकार परिषदेत काय ( Sharad Pawar on UPA leadership ) म्हणाले, वाचा...

Siraj Mehndi joins NCP
सिराज मेहंदी यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

मुंबई -भारतीय जनता पक्षाला शह देण्यासाठी यूपीएचे नेतृत्व ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( NCP Leader Sharad Pawar ) यांनी करावे असे आवाहन उत्तर प्रदेशमधील नेते सिराज मेहंदी यांनी ( Siraj Mehndi appeal to Sharad Pawar ) केले आहे. आज सिराज मेहंदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश ( Siraj Mehndi joins NCP ) केला. ते मागील चाळीस वर्षापासून उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस पक्षासोबत काम करत होते. उत्तर प्रदेश विधान परिषदेमध्ये ते आमदार होते.

सिराज मेहंदी यांचे पवारांना आवाहन, शरद पवार म्हणाले...

सिराज मेहंदी यांचा राष्ट्रवादीत प्रवेश -

भारतीय निवडणूक आयोगाने पाच राज्यामध्ये फेब्रुवारी ते मार्च 2022 च्या दरम्यान निवडणुका होणार असल्याचे जाहीर केले आहे. आज ( मंगळवार ) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण तीन राज्यात निवडणूक ( Sharad Pawar on Assembly Election ) लढवणार असल्याचे सांगितले आहे. यावेळी काँग्रेस पक्षात 40 वर्ष कार्यरत असलेले सिराज मेहंदी यांनी राष्ट्रवादीत शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे. यावेळी ते बोलत होते.

शरद पवारांनी दिले उत्तर -

सिराज मेहंदी यांनी केलेल्या आवाहनानंतर शरद पवार यांनी त्यांच्या वक्तव्याशी आपण सहमत नसल्याचे स्पष्ट केले. अद्यापही काँग्रेसची देशांमध्ये मोठी ताकत आहे. काही राज्यांमध्ये काँग्रेसला दुर्लक्षित करून चालणार नाही. मात्र त्या राज्यांमध्ये काँग्रेसला कोणासोबत जायचंय आहे त्यांचा अधिकार आहे. पण जिथे काँग्रेस पक्ष कमकुवत असेल तिथे इतर विरोधी पक्ष एकत्र येऊन युपीए मजबूत केलं गेलं पाहिजे असे मत शरद पवारांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत व्यक्त केले. तसेच युपीएच्या त्यांच्या नेतृत्वाबाबत चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न शरद पवारांकडून करण्यात आला.

हेही वाचा -Sharad Pawar on Assembly Election : राष्ट्रवादी तीन राज्यात निवडणूक लढवणार, यूपीत सपाशी युती

हेही वाचा -Umarkhed Firing : उमरखेड उत्तरवार रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. हनुमंत धर्मकारे यांच्या गोळीबारात मृत्यू;

Last Updated : Jan 11, 2022, 7:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details